पदव्युत्तर वैद्यकीय प्रवेश 2019: मराठा आरक्षण अध्यादेशाला आव्हान देणारी याचिका सर्वोच्च न्यायालयाने फेटाळली
पदव्युत्तर वैद्यकीय प्रवेशाबाबत राज्य सरकारला सुप्रीम कोर्टाचा दिलासा,यंदा डेंटल आणि मेडिकल प्रवेशासाठी मराठा आरक्षणाचा जो अध्यादेश महाराष्ट्र सरकारने काढला होता त्याला आव्हान देणारी याचिका सुप्रीम कोर्टाने फेटाळली आहे.
पदव्युत्तर वैद्यकीय प्रवेशप्रक्रिया 2019 यंदा महाराष्ट्रामध्ये अनेकदा न्यायालयीन सुनावणीमुळे रखडली. महाराष्ट्रात मराठा समाजाला 16% आरक्षण देण्यात आलं आहे. त्यानुसार विद्यार्थ्यांना आरक्षणाचा फायदा घेत नोकरी आणि शिक्षणामध्ये 16% आरक्षणाचा फायदा घेत आर्थिकदृष्ट्या मागास वर्ग म्हणून विशेष आरक्षण देण्यात आलं होतं. त्याचा अध्यादेश राज्य सरकारने काढला होता. मात्र त्याला न्यायालयात आव्हान देण्यात आलं आहे. आता सर्वोच्च न्यायालयाने या अध्यादेशाला आव्हान देणारी याचिका फेटाळल्याने सरकारला मोठा दिलासा मिळाला आहे.
ANI Tweet
काही दिवसांपूर्वी विधीमंडळाच्या कामकाजादरम्यान सरकारने याच अध्यादेशाचे कायद्यामध्ये बदल केला आहे. आमदारांनी दोन्ही सभागृहात विधेयक एकमताने मंजूर केलं आहे. आरक्षण लागू होण्यापूर्वीच प्रवेशप्रक्रिया सुरू झाल्याचा दावा करत आरक्षणानुसार प्रवेश न देण्याबाबत काही विद्यार्थ्यांनी न्यायालयात दाद मागितली.