IPL Auction 2025 Live

'महाराष्ट्राला आठवड्याभरात लसींचा पुरवठा वाढवला नाही तर SII कडून होणारी लस वाहतूक थांबवू'; राजू शेट्टी यांचा पत्राद्वारे केंद्राला इशारा

या वादात आता स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते राजू शेट्टी यांनी उडी घेतली आहे.

Raju Shetti (Photo Credits: Facebook)

राज्यात गेल्या काही दिवसांपासून कोविड-19 लसीचा (Covid-19 Vaccine) तुटवडा जाणवू लागला आहे. यामुळे राज्यातील विविध ठिकाणीच लसीकरण केंद्र बंद झाली आहेत. केंद्राकडे वारंवार लसीची मागणी करुनही पुरेसा पुरवठा होताना दिसत नाही. याउलट यावरुन केंद्र आणि राज्य असा वाद निर्माण झाला आहे. या वादात आता स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते राजू शेट्टी (Swabhimani Shetkari Saghtana leader Raju Shetti) यांनी उडी घेतली आहे. महाराष्ट्राला आठवड्याभरात लसींचा पुरवठा वाढवला नाही तर सीरम इन्स्टिट्यूट ऑफ इंडियाकडून (Serum Institute of India) होणारी लस वाहतूक थांबवू असा थेट इशारा शेट्टी यांनी पत्राद्वारे केंद्राला दिला आहे.

राजू शेट्टी म्हणाले, "महाराष्ट्राला आठवड्याभरात लसांचा पुरवठा वाढवला गेला नाही तर आम्ही सीरम इन्स्टिट्यूट ऑफ इंडियाकडून इतर राज्यात लसींची वाहतूक करणारी वाहने थांबवू असे पत्र मी पंतप्रधान नरेंद्र मोदी, गृहमंत्री अमित शाह आणि आरोग्यमंत्री डॉ. हर्षवर्धन यांना लिहिले आहे."

ANI Tweet:

राजू शेट्टी यांना केंद्राला लसीकरण वाढवण्यासाठी आठवडाभराची मूदत दिली असून तसे न झाल्यास सीरम इंस्टीट्युटमधून इतर राज्यांना होणारा लस पुरवठा बंद करण्यात येईल, असा इशाराही दिला आहे.

दरम्यान, राज्याचे आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी देखील आठवड्याला 40 लाख लस देण्याची मागणी केंद्राकडे केली आहे. तसंच राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्या सुप्रिया सुळे, रोहित पवार यांनी देखील लस पुरवठ्याची मागणी केंद्राकडे केली आहे.