Summer 2022: मुंबईकरांसाठी 24 एप्रिलची रात्र ठरली किमान तापमानाची दशकातील दुसरी सर्वात उष्ण रात्र

मागील वर्षी देखील 26 एप्रिलच्या रात्री सर्वाधिक किमान तापमान 27.8 अंश सेल्सियस नोंदवण्यात आले होते.

Night (Photo Credits: ANI/Twitter)

सध्या बिघडलेल्या ऋतुमानच्या चक्रामुळे कुठे ऐन उन्हाळ्यात अवकाळी पाऊस बरसत आहे तर कुठे उन्हाने अंगाची काहिली होत आहे. मुंबईकरांसाठी (Mumbai) कालची रात्र सामान्य किमान तापमानापेक्षा थोडी उष्ण होती. 24 एप्रिलच्या रात्री मागील दशकातील दुसरी सर्वात उष्ण रात्र (Second Highest Minimum Temperature in a Decade) नोंदवण्यात आली आहे. कालचं तापमान 27.8 अंश सेल्सियस होते. मागील वर्षी देखील 26 एप्रिलच्या रात्री सर्वाधिक किमान तापमान 27.8 अंश सेल्सियस नोंदवण्यात आले होते.

TOI च्या रिपोर्टप्रमाणे आयएमडी कुलाबा कडून दिलेल्या माहितीनुसार, कमाल तापमान काल 34 अंश नोंदवण्यात आले आहे. जे 1.2 डिग्री अधिक आहे. तर सांताक्रुझ वेधशाळेने नोंदवलेल्या माहितीनुसार, कमाल तापमान 35.5 अंश आहे. जे 2.2 डिग्री अधिक आहे. दरम्यान त्या आधीच्या दिवसापेक्षा काल वातावरणातील उष्णतेमध्ये थोडी घट पहायला मिळली आहे. हवामान खात्याने सध्या वातावरण असंचं उष्ण राहणार असल्याचा अंदाज वर्तवला आहे. हे देखील नक्की वाचा:  Temperature Update: नवी मुंबईत तापमान वाढल्याने बालरोगाच्या रुग्णांमध्ये 10% वाढ .

.सांताक्रुझ वेधशाळेने नोंदवलेले रात्रीचं तापमान देखील थोडं उष्णचं आहे. कुलाबामध्ये 27.4 आणि सांताक्रुझ मध्ये 27.8 अंश सेल्सियस तापमानाची नोंद आहे. 2019 साली सर्वाधिक तापमान 28 अंश सेल्सियस नोंदवण्यात आले आहे. वेधशाळेच्या माहितीनुसार हवामानातील आद्रता 75% (कुलाबा) आणि 71% (सांताक्रुझ) आहे.

मागील वर्षी सर्वाधिक तापमानाची नोंद 7 एप्रिलला 35.8 अंश इतकी नोंदवण्यात आली आहे. 14 एप्रिल 1952 दिवशी मुंबई शहरात सर्वाधिक तापमान हे एप्रिल महिन्यातील 42.2 अंश इतके आतापर्यंत नोंदवण्यात आले आहे.



00" height="600" layout="responsive" type="mgid" data-publisher="bangla.latestly.com" data-widget="1705935" data-container="M428104ScriptRootC1705935" data-block-on-consent="_till_responded"> @endif