Mumbai Police Suicide: आंतर जिल्हा बदली होत नसल्याने नैराश्यातून पोलिस निरिक्षकाची आत्महत्या, सांताक्रुझ येथे खळबळ

मुंबईतील सांताक्रुझ परिसरात राहणाऱ्या पोलस कॅम्पमधील T5 इमारत क्रंमाकात राहणाऱ्या पोलिस अधिकाऱ्याने गळफास लावून आत्महत्या केल्याचे धक्कादायक घटना समोर आली आहे.

Pc file

Mumbai Police Suicide: मुंबईतील सांताक्रुझ पोलस कॅम्पमधील T5 इमारत क्रंमाकात राहणाऱ्या पोलिस अधिकाऱ्याने गळफास लावून आत्महत्या केल्याचे धक्कादायक घटना समोर आली आहे. या घटनेने कॅम्प परिसरात शोककळा पसरली आहे. प्रल्हाद बनसोडे (वय वर्ष ४२) असं आत्महत्या करणाऱ्या पोलिसाचे नाव होते. ते सहाय्यक पोलिस निरिक्षक पदावर कार्यरत होते. आत्महत्या करण्याचे नेमके कारण अद्याप समोर आले नाही परंतु आंतर जिल्हा बदली होत नसल्याने आत्महत्या केली अशी परिसरात चर्चा आहे.( हेही वाचा- हृदयविकाराच्या धक्क्याने पतीचे 25 व्या वर्षी निधन, दु:ख सहन न झाल्याने पत्नीचाही मृत्यू

मिळालेल्या माहितीनुसार, सांयकाळी साडे सहाच्या सुमारास घरी कोणी नसताना, प्रल्हाद इमारतीच्या टेरेसवर गेले आणि तेथेच त्यांनी गळफास लावून घेतला. थोड्यावेळाने इमारतीतील वॉचमॅन हे टेरेसवर कामानिमित्त गेले होते. त्यावेळीस त्यांना प्रल्हाद हे लटकलेल्या अवस्थेत दिसले. या घटनेची माहिती वॉचमॅनने इतर पोलिसांना दिली. प्रल्हाद यांच्या पत्नी सांयकाळच्या वेळी भाजी आणण्यास बाजारात गेली होती त्यावेळी त्यांनी हे कृत्य केले.

प्रल्हाद बनसोडे यांच्या पश्च्यात दोन मुले आणि पत्नी आहेत.मुंबई पोलिसांचा BDDS पथकात कार्यरत होते या घटनेमुळे कुटुंबियांवर दुखाचा डोंगर कोसळला आहे. घटनास्थळी वाकोला पोलिस ADR दाखल करून घेतली आहे. प्रल्हाद हे जळगावचे निवासी होते. त्यांना आंतर जिल्हा बदली व्हावी यासाठी ते प्रयत्न करत होते. पण त्यांची बदली होत नव्हीती. या कारणाने ते तणावात आले आणि आत्महत्या केली अशी प्राथमिक माहिती समोर आली आहे.