IPL Auction 2025 Live

Farmer Suicides in Yavatmal: धक्कादायक! यवतमाळ जिल्ह्यात 3 दिवसांत पाच शेतकऱ्यांच्या आत्महत्या

कारण, त्यांच्या पिकांचे वन्य प्राण्यांनी नुकसान केलं होतं. 13 ऑगस्ट रोजी तिवरंग गावातील शेतकरी नामदेव वाघमारे (वय, 45) आणि लोहारा गावातील रामराव राठोड (42) यांनी आर्थिक तणावामुळे आत्महत्या केल्याचा दावा कार्यकर्त्याने केला.

Suicide | (Photo Credits: unsplash.com)

Farmer Suicides in Yavatmal: 13 ते 15 ऑगस्ट या कालावधीत पूर्व महाराष्ट्रातील यवतमाळ (Yavatmal) जिल्ह्यात पीक अपयश किंवा शेतीशी संबंधित आर्थिक समस्यांमुळे पाच शेतकऱ्यांनी आपले जीवन संपवले, असा दावा एका कार्यकर्त्याने केला. एका स्थानिक अधिकाऱ्याने या घटनांना दुजोरा दिला. परंतु, या आत्महत्येची कारणे अद्याप समजू शकलेली नाहीत. विदर्भात (पूर्व महाराष्ट्र) या वर्षात आतापर्यंत 1,565 शेतकरी आत्महत्या झाल्या आहेत, असा दावा कार्यकर्ते किशोर तिवारी यांनी केला आहे. किशोर तिवारी हे शेतकरी कल्याणासाठी राज्य सरकारच्या वसंतराव नाईक शेतकरी स्वावलंबी मिशनचे माजी अध्यक्ष आहेत.

यवतमाळ जिल्ह्यातील येराड गावात राहणाऱ्या मनोज राठोड (वय, 35) नावाच्या शेतकऱ्याने 15 ऑगस्ट रोजी आर्थिक संकटामुळे गळफास लावून घेतला. टेंभी गावातील आदिवासी शेतकरी कर्णू किनाके (वय, 51) यांनी आर्थिक कारणामुळे 14 ऑगस्ट रोजी आत्महत्या केली. त्याच दिवशी उमर विहीर गावातील शालू पवार (वय, 42) यांनी आत्महत्या केली.

किशोर तिवारी यांनी सांगितलं की, या दोघांचेही नुकसान झाले आहे. कारण, त्यांच्या पिकांचे वन्य प्राण्यांनी नुकसान केलं होतं. 13 ऑगस्ट रोजी तिवरंग गावातील शेतकरी नामदेव वाघमारे (वय, 45) आणि लोहारा गावातील रामराव राठोड (42) यांनी आर्थिक तणावामुळे आत्महत्या केल्याचा दावा कार्यकर्त्याने केला.

अमरावती जिल्ह्यातील शिराळा गावातही एका शेतकऱ्याने गेल्या काही दिवसांपासून प्रचंड कर्ज आणि पीक नापिकीमुळे आपले जीवन संपवले, असे तिवारी यांनी सांगितले. कापूस या मुख्य नगदी पीक ज्याला फार कमी मागणी आहे, त्याने अर्थव्यवस्था ठप्प झाली आहे. इनपुट कॉस्ट अचानक वाढली आहे आणि PSU बँकांनी दिलेल्या अत्यंत कमी कर्जामुळे संकटात आणखी भर पडली आहे, असंही तिवारी यांनी सांगितलं आहे.

यवतमाळमधील एका वरिष्ठ सरकारी अधिकाऱ्याने नुकतेच जिल्ह्यात पाच शेतकऱ्यांनी जीवन संपवल्याची पुष्टी केली. या मृत्यूंमागे शेतीशी संबंधित त्रास किंवा कौटुंबिक वाद किंवा अन्य कारणे आहेत का याचा पोलीस आणि महसूल विभाग तपास करत आहेत.