मुंबई पोलीस महासंचालक म्हणून सुबोध जैसवाल तर मुंबई पोलीस आयुक्तपदी संजय बर्वे यांची नियुक्ती

तर लाचलुचपत प्रतिबंधक विभागाचे महासंचालक संजय बर्वे यांची मुंबई पोलीस आयुक्तपदी नियुक्ती झाली आहे

सुबोध जैसवाल आणि संजय बर्वे (संग्रहित-संपादित प्रतिमा)

मुंबई पोलीस महासंचालक दत्ता पडसलगीकर सेवानिवृत्त होत आहेत. सध्या देशातील तणावाचे वातावरण पाहता इतके मोठे पद रिकामे ठेवणे योग्य नाही त्यामुळे आता सध्याचे मुंबई पोलीस आयुक्त सुबोध जैसवाल  यांची मुंबई पोलीस महासंचालक म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे. तर लाचलुचपत प्रतिबंधक विभागाचे महासंचालक संजय बर्वे यांची मुंबई पोलीस आयुक्तपदी नियुक्ती झाली आहे. आज तत्काळ ही पडे भरण्यात आली आहेत. सुबोध कुमार जैसवाल हे 1985 बॅचचे आयपीएस अधिकारी आहेत, तर संजय बर्वे हे 1986 बॅचचे आयपीएस अधिकारी आहेत. (हेही वाचा: मुंबई, पंजाब, गुजरात सीमेवर भारतीय वायुसेनेकडून हाय अलर्ट जाहीर)

मुंबईच्या पोलीस महासंचालकपदाची धुरा सुबोध कुमार जैसवाल हे सांभाळणार हे निश्चित झाले होते, मात्र आयुक्तपदासाठी संजय बर्वे आणि परमबीर सिंह ही नवे शर्यतीत होती. बर्वे हे मराठी असल्याने राजकीय पक्षांकडूनही त्यांच्याच नावाला पाठींबा होता. त्यानुसार आज मुंबईचे आयुक्त म्हणून त्यांचेच नाव जाहीर करण्यात आले. बर्वे याचवर्षी निवृत्त होत असल्यामुळे त्यांच्यासाठी ही शेवटी संधी आहे. त्यांच्या पाठोपाठ परमबीर सिंग हे मुंबई पोलीस आयुक्त पदाच्या शर्यतीत आहेत.