Nagpur Stunt Video: धबधब्यावर मित्रांसोबत स्टंटबाजी बेतली जीवावर, एकाचा पाण्यात बूडून मृत्यू (Watch video)

धबधब्याच्या सांडव्यावर उभे राहून स्टंटबाजीचा प्रयत्न करत होता. तेवढ्यात त्याचा पाय घसरला आणि पाण्यात पडला.

Nagpur stunt Video PC TWITTER

Nagpur Stunt Video: मित्रांसोबत धबधब्यावर जाऊन नको ते धाडसं करणं एका तरुणाच्या जीवाशी बेतले आहे. धबधब्याच्या सांडव्यावर उभे राहून स्टंटबाजीचा प्रयत्न करत होता. तेवढ्यात त्याचा पाय घसरला आणि पाण्यात पडला. पाण्यात बूडून तरुणाचा मृत्यू झाला. ही घटना नागपूर शहरातील आहे. या घटनेनंतर धबधब्यावर भीतीचे वातावर पसरले होते. धबधब्यावर वातावरणाचा आनंद लुटण्याठी ठिकठिकाणी पर्यटकांनी गर्दी केली आहे. (हेही वाचा-  सीट मिळवण्यासाठी खिडकीमधून बसमध्ये चढली महिला, पुढे जे झाले ते पाहून बसेल धक्का, पाहा व्हिडीओ)

मिळालेल्या माहितीनुसार, १५ ऑगस्ट रोजी उमरखेड येथील मकरधोडक धबधब्यावर एक घात घडला. तरुणाचा पाण्यात बूडून मृत्यू झाला. तरुण आपल्या मित्रांसोबत मकरधोकड धबधब्यावर फिरण्यासाठी आला होता.  त्यावेळीस त्याने मित्रांसोबत स्टंटबाजी करण्याचे ठरवले. मित्रांसोबत स्टंटबाजी करत असताना तो सांडव्याच्या भिंतीवर चढला.  तेथे उभा राहून स्टंटबाजी करत असताना काही क्षणातच त्याचा पाय घसरला आणि धबधब्याच्या दुसऱ्या बाजूला पडला. धबधब्यावर पाण्याचा प्रवाह खूप होता.

एकाने या घटनेचा व्हिडिओ फोनमध्ये शूट केला. तरुण पाण्यात पडल्याने धबधब्यावर भीतीचे वातावरण निर्माण झाले. घटनेची माहिती बचावकार्याला देण्यात आली. या घटनेनंतर पर्यटकांनी स्वत: ची काळजी घेणे आणि जीव धोक्यात जाईल असे कोणतेही कृत्य करू नये असे आवाहन देण्यात आले.