IPL Auction 2025 Live

पुण्यातील Amazon Delivery Agents चा संप सलग पाचव्या दिवशीही सुरु; पार्सल्स डिलिव्हर न झाल्याने ग्राहकांची गैरसोय

16 मार्च पासून सुरु झालेल्या या संपानंतर एकही डिलिव्हरी बॉय कामावर रुजू झाला नाही. अॅमेझॉनने पॅकेज चार्ज कमी केल्यांमुळे डिलिव्हरी एजंट्सने संप पुकारला आहे.

प्रतिकात्मक फोटो (Photo Credit: BussinessSuiteOnline.com)

पुण्यातील (Pune) अॅमेझॉन डिलिव्हरी एजंट्सच्या (Amazon Delivery Agents) संपाचा आज पाचवा दिवस आहे. 16 मार्च पासून सुरु झालेल्या या संपानंतर एकही डिलिव्हरी बॉय कामावर रुजू झालेला नाही. अॅमेझॉनने पर पॅकेज चार्ज (Per-Package Charge) कमी केल्यांमुळे डिलिव्हरी एजंट्सने संप पुकारला आहे. कंपनीने कोणत्याही नोटीसशिवाय पार्सलची किंमत कमी केली असून याबद्दल कोणतेही स्पष्टीकरण दिलेले नाही, असे डिलिव्हरी वर्कर्सचे म्हणणे आहे. त्याचबरोबर त्यांनी आपल्या विविध मागण्या कंपनीसमोर ठेवल्या असून त्या मागण्या पूर्ण होईपर्यंत अॅमेझॉनचे पॅकेजेस डिलिव्हर होणार नाहीत, असेही वर्कर्संनी सांगितले.

डिलिव्हरी वर्कर्सच्या या संपामुळे पुण्यातील नागरिकांची गैरसोय होत आहे. या संपामुळे पुण्यातील अॅमेझॉनच्या गोडाऊन्समध्ये देखील वेगवेगळ्या पार्सल्सचा डोंगर उभा राहिला आहे. या संपानंतर कित्येक पुण्यातील अॅमेझॉन युजर्संना ऑनलाईन ऑर्डर करताना अडचणींना सामोरे जावे लागत आहे. घरापर्यंत पार्सल पोहचू शकत नसल्याचा मेसेज युजर्संना ऑर्डर करताना दिसत आहे.

पुणे आणि पिंपरी-चिंचवड मधल्या बहुतेक अॅमेझॉन डिलिव्हरी एजंट्सने गेल्या काही दिवसांत एकही पॅकेज डिलिव्हर केलेले नाही. यामुळे शहरातील कित्येक ऑनलाईन पार्सल्स अडकून पडली आहेत. (Amazon Summer Carnival Sale ला सुरुवात: Summer Appliances वर 50% सूट)

डिलिव्हरी एजंट्सना मोठ्या पॅकेजमागे 35 रुपये तर छोट्या पॅकेजमागे 22 रुपये मिळत होते. परंतु, कंपनीने आता ही किंमत कमी करुन अनुक्रमे 17 आणि 10 रुपये इतकी केली आहे, असे हिंदुस्तान टाईम्सच्या एका रिपोर्टमध्ये म्हटले आहे. रिपोर्टनुसार, पुण्यात 15 ते 20 हजार अॅमेझॉन डिलिव्हरी वर्कर्स असून प्रत्येक अॅमेझॉन डिलिव्हरी वर्कर दिवसाला 70 ते 80 पॅकेजेस डिलिव्हर करतो.