Gautami Patil: गौतमी पाटील हिचा कार्यक्रम अर्ध्यावरच थांबवला, काय घडले नेमके घ्या जाणून

दरम्यान या सर्व प्रकारानंतर डान्सर गौतमी पाटील यांनी नाराजी व्यक्त केली आहे. या सगळ्या गोंधळानंतर गौतमी पाटीलने डान्सचा कार्यक्रम अर्ध्यावरच बंद केला.

Gautami Patil | PC: Instagram

डान्सर गौतमी पाटीलच्या (Gautami Patil) कार्यक्रमात होणाऱ्या हुल्लडबाजीचे प्रमाण हल्ली जास्तच वाढले असून यामुळे प्रशासनावर  गौतमी पाटीलचा कार्यक्रम म्हटलं की तरुणाईची गर्दी होणार हे नक्की. मात्र गौतमीच्या कार्यक्रमादरम्यान बेभान झालेल्या तरुणांमुळे अनेकदा तरुण दारु पिऊन गोंधळ झाल्याचं दिसून आलं आहे. आता अहमदनगरमध्ये (Ahmednagar News) गौतमीच्या कार्यक्रमात दगडफेकीची घटना समोर आली आहे.  नवनागापूरच्या सरपंचाच्या नातीच्या वाढदिवसानिमित्त गौतमी पाटीलच्या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आलं होतं. गौतमीचा कार्यक्रम म्हणून मोठ्या संख्येने तरुणांनी येथे उपस्थिती लावली होती. (हेही वाचा - BEST Bus Strike: घाटकोपर, मुलुंड आगारामध्ये कंत्राटी कर्मचारी संपावर; वाहतूक सेवा विस्कळीत)

गौतमीचा कार्यक्रम सुरू असताना हुल्लडबाजांनी कार्यक्रमात गोंधळ घालायला सुरुवात केली. मात्र चोख सुरक्षाव्यवस्था नसल्याने गोंधळ वाढत गेला आणि तेथे दगडफेक झाली. हुल्लडबाजांच्या या दगडफेकीत एक महिला किरकोळ जखमी झाली आहे. या ठिकाणी पोलीस आणि खासगी बाउन्सर समोर असून देखील हुल्लडबाजांनी धिंगाणा हा घातला.

दरम्यान या सर्व प्रकारानंतर डान्सर गौतमी पाटील यांनी नाराजी व्यक्त केली आहे. या सगळ्या गोंधळानंतर गौतमी पाटीलने  डान्सचा कार्यक्रम अर्ध्यावरच बंद केला. तसेच यापुढच्या कार्यक्रमात आयोजकांनी व्यवस्थित बंदोबस्त ठेवला नाही तर कार्यक्रम घेणार नसल्याचे गौतमी पाटीलने सांगितले आहे.

Share Now
Advertisement


Advertisement
Advertisement
Share Now
Advertisement