Maharashtra Congress मध्ये मोठे फेरबदल, Atul Londhe यांच्याकडे मुख्य प्रवक्ते पदाची जबाबदारी; नाराजी नाट्यही रंगले, सचिन सावंत यांचा राजीनामा

या बदलामुळे अनेक चेहऱ्यांना नवी संधी मिळाली आहे. परंतू त्याचा परिणाम नाराजीनाट्यातही झाल्याचे पाहायला मिळत आहे. नव्या फेरबदलानुसार अतुल लोंढे (Atul Londhe) यांना महाराष्ट्र काँग्रेस मुख्य प्रवक्ते म्हणून जबाबदारी दिली आहे.

Nana Patole | (Photo Credits: Archived, edited, symbolic images)

काँग्रेस (Maharashtra Congress) पक्षाचे महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष नाना पटोले (Nana Patole) यांनी पक्षसंघटनेत राज्यपातळीवर मोठे फेरबदल केले आहेत. या बदलामुळे अनेक चेहऱ्यांना नवी संधी मिळाली आहे. परंतू त्याचा परिणाम नाराजीनाट्यातही झाल्याचे पाहायला मिळत आहे. नव्या फेरबदलानुसार अतुल लोंढे (Atul Londhe) यांना महाराष्ट्र काँग्रेस मुख्य प्रवक्ते म्हणून जबाबदारी दिली आहे. तर भाजपला सोडचिठ्ठी देऊन काँग्रेसमध्ये प्रवेश केलेल्या डॉ. सुनिल देशमुख यांच्याकडे डे आघाडी संघटना, विभाग व सेलची जबाबदारी सोपविण्यात आली आहे. दरम्यान, काँग्रेस प्रवक्ते सचिन सावंत (Sachin Sawant) यांनी आपल्या प्रवक्ते पदाचा राजीनामा दिला असून त्यांनी थेट हायकमांडलाच पत्र लिहिल्याचे समजते.

काँग्रेसमधील नव्या नियुक्त्या

प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी पक्ष संघटना आणि पक्षाचे धोरण यांच्यातील कार्यक्रमात सूसूत्रता यावी यासाठी विविध समित्यांची रचना केली आहे. त्यानुसार नवनियुक्त्याही केल्या आहेत. त्या नियुक्त्या खालील प्रमाणे. (हेही वाचा, UP Assembly Elections 2021: प्रियंका गांधी यांचा मास्टरस्ट्रोक, उत्तर प्रदेश विधानसभा निवडणुकीत काँग्रेस पक्षाकडून महिलांना 40% उमेदवारी)

माध्यम आणि संवाद विभाग समिती

मुख्य प्रवक्ते- अतुल लोंढे

सरचिटणीस व प्रवक्ते- सचिन सावंत. जाकीर अहमद (प्रवक्ते)

अध्यक्ष व मान्यवरांच्या दौऱ्याचे नियोजना- देवानंद पवार (प्रदेश सरचिटणीस)

सोशल मीडिया विभागप्रभार- विशाल मुत्तेमवार (प्रदेश सरचिटणीस)

आघाडी संघटना, विभाग व सेल

प्रमुख- डॉ. सुनिल देशमुख (प्रदेश उपाध्यक्ष)

सदस्य- शरद आहेर, अभिजीत वंजारी ,दिप्ती चवधरी

निवडणूक व्यवस्थापन समिती

प्रमुख- रमेश शेट्टी

सहप्रमुखपदी प्रदेश- राजन भोसले, मुनाफ हकीम

सदस्य- विश्वजीत हाप्पे

प्रशिक्षण विभाग

प्रमुख- रामहरी रूपनवर

सहप्रमुख-शाम उमाळकर, संजय बालगुडे

सदस्य- डॉ. हेमलता पाटील आणि जयश्री शेळके

राजकीय कार्यक्रमाच्या नियोजन समिती

प्रमुख- हुसेन दलवाई

सहप्रमुख- अॅड. गणेश पाटील

सदस्य- सुर्यकांत पाटील, प्रशांत गावंडे

बुथ विस्तार समिती

प्रमुख- भा. ई. नगराळे

सहप्रमुख- हरिष पवार

सदस्य- सचिन साठे, नंदा म्हात्रे

दरम्यान, नाना पटोले यांनी प्रदेशाध्यक्ष या नात्याने केलेल्या महत्त्वपूर्ण बदलामुळे काँग्रेसमध्ये मोठी हालचाल निर्माण झाली आहे. काहींची नाराजी स्पष्ट दिसून आली आहे. मात्र काँग्रेसमधील इतर वरिष्ठ नेत्यांमध्ये काय भावना आहे हे समजू शकले नाही. ज्येष्ठांच्या प्रतिक्रियेबद्दल उत्सुकता आहे.