मुलांच्या संरक्षण आणि पुनर्वसनासाठी लवकरच फॉस्टर केअर पॉलिसी लागू केली जाईल- यशोमती ठाकूर
फोस्टर केअर पॉलिसी ही अशाच मुलांसाठी आहे जेथे पालक काही वेळापुरता किंवा जास्त काळाकरता एखाद्या मुलाचे पालक बनू शकता.
काँग्रेस नेत्या तसेच महिला आणि बालकल्याणमंत्री यशोमती ठाकूर (Congress Leader Yashomati Thakur)यांनी ए्क महत्त्वाची घोषणा केली आहे. लवकरच महाराष्ट्रात मुलांच्या संरक्षणासाठी आणि पुनर्वसनासाठी फॉस्टर केअर पॉलिसी (Foster Care Policy) लागू केली जाईल, अशी माहिती त्यांनी PTI शी बोलताना दिली. त्याचबरोबर ही पॉलिसी केवळ अनाथ मुलांसाठी नसून ज्या मुलांची सुरक्षा आणि संरक्षण करायचे असेल त्यांनाही दिली जाईल असेही त्या PTI शी बोलताना सांगितले.
याचा मुख्य उद्देश म्हणजे प्रत्येक मुलास त्याची स्वत:ची काळजी घेण्याचा पूर्ण अधिकार आहे. फोस्टर केअर पॉलिसी ही अशाच मुलांसाठी आहे जेथे पालक काही वेळापुरता किंवा जास्त काळाकरता एखाद्या मुलाचे पालक बनू शकता. पनवेल येथील इंडिया बुलच्या क्वारंटाइन सेंटरमध्ये बलात्कार करणाऱ्या आरोपीविरोधात कठोर कारवाई करावी; महिला व बाल विकास मंत्री यशोमती ठाकूर यांची गृहमंत्री अनिल देशमुख यांच्याकडे मागणी
या पॉलिसीनुसार, पालकांना त्या पाल्याची किती गरज आहे, त्यासाठी ते सक्षम आहेत का आणि मुलं सांभाळण्याचा त्यांना अनुभव आहे का या निकषांवर निवडले जाईल. त्यानंतर निवडक पालकांना मुलांचे पालकत्व स्विकारण्यासाठी काही महत्त्वाचे प्रशिक्षण दिले जाईल. हे फोस्टर पालक कायमचे त्या मुलाचे पालक राहणार नसून त्या मुलावर त्यांचा कोणताच अधिकार राहणार नाही. मुलांची काळजी आणि संरक्षण हे महत्त्वाचे असून या गोष्टीला सर्वात जास्त प्राधान्य दिले जाईल अशाही त्या पुढे म्हणाल्या.
ही पॉलिसी मुंबई उपनगर, सोलापूर, पुणे, पालघर आणि अमरावती येथे लवकरच लागू केली जाईले असेही त्यांनी सांगितले.
कलेक्टरच्या अध्यक्षतेखाली राज्य स्तरीय कमिटी बनविली जाईल जे अशा पालकांची यादी बनवेल जे मुलांची काळजी काळजी घेण्यास सक्षम असतील असेही यशोमती ठाकूर यांनी सांगितले.