State Cabinet Decision: ग्रामसेवकांच्या मानधनात वाढ, राज्य मंत्रिमंडळाचा निर्णय
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखाली पार पडलेल्या मंत्रिमंडळ बैठकीत हा निर्णय घेण्यात आला. राज्य सरकारने या बैठकीत विविध निर्णय घेतले.
राज्यातील ग्रामसेवकांच्या पगारात वाढ करण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतला आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखाली पार पडलेल्या मंत्रिमंडळ बैठकीत हा निर्णय घेण्यात आला. राज्य सरकारने या बैठकीत विविध निर्णय घेतले. ग्रामसेवकांच्या पगारवाढीचा निर्णयही यापैकीच एक आहे. पर्जन्यवृष्टीमुळे नुकसान सहन कराव्या लागलेल्या शेतकऱ्यांसाठीही तत्काळ मदत देण्याचा निर्णय सरकारने घेतला. राज्य मंत्रिमंडळाने घेतलेले निर्णय खालील प्रमाणे.
मंत्रीमंडळातील निर्णय
- कंत्राटी सेवकाच्या वेतनात वाढ – आता १६ हजार
मिळणार,
- पुर्वी ह्या सेवकांना वेतन फक्त सहा हजार होते,
राज्य सरकारच्या आजच्या निर्णयामुळे सेवकांना तब्बल १६ हजार वेतन मिळणार असल्याचे
घोषित केले.
- पावसाळामुळे त्रस्त झालेल्या शेतकऱ्यांना सरकार
कडून १५०० कोटीं रुपयांची मदत मिळणार असल्याचे घोषित केले.
- राज्य सरकारने ह्या काही
दिवसात शेतकऱ्यांसाठी अनेक उत्तम निर्णय घेतले, शिंदे सरकारने आजच्या बैठकीत
शेतकऱ्यांसाठी चिंता व्यक्त केली, यंदा पाऊस कमी होण्याची शक्यता आहे.
- अनुसुचित जाती प्रवर्गातील विद्यार्थांसाठी
निर्वाह भत्यात केद्रांप्रमाणे सुधारणा
- पाचवी आणि आठवीच्या शालेय विद्यार्थांना अधिक प्रोत्साहन
देण्यासाठी शिष्यवृत्तीत वाढ
- लातुर येथे पशुरोग निदान प्रयोगशाळा स्थापना
करणार
- पुणे येथे ४ अतिरिक्त कौटुंबिक न्यायालाये
स्थापन करणार
- अतिरिक्त न्यायालये व जलदगती न्यायालयांना दोन वर्षे मुदतवाढ
- मानसिक आजारमुक्त व्यक्तींकरीता पुनर्वसन गृहे
योजना
- स्वातंत्र्य सैनिकांना घरांसाठी जमीन
देण्यासाठी कौटुंबिक मासिक उत्पन्न मर्यादेत वाढ
- चिमूर आणि शिर्डी येथे अप्पर जिल्हाधिकारी कार्यालय स्थापन करणार