Malshej Accident: एसटी बस आणि ट्रकची धडक, २० प्रवासी गंभीर जखमी,माळशेज घाटात अपघात
नगर कल्याण महामार्गवरील माळशेज घाटात एसटी बस आणि ट्रक एकमेकांना जोरदार धडकल्या.
Malshej Accident: माळशेज घाटात एका एसटी बसचा भीषण अपघात झाला आहे. नगर कल्याण महामार्गवरील माळशेज घाटात एसटी बस आणि ट्रक एकमेकांना जोरदार धडकल्या. या धडकेत २० प्रवाशी जखमी झाल्याची माहिती मिळाली आहे. या घटनेत कोणतीही जीवीतहानी झालेली नाही. सर्व जखमी प्रवाशांना रुग्णलयात दाखल करण्यात आले आहे. सद्या शासकीय रुग्णालयात त्यांच्यावर उपचार सुरु आहेत. पोलीसांनी घटनास्थळी दाखल होवून घटनेची तपासणी सुरु केला आहे. शुक्रवारी रात्रीच्या वेळीस हा अपघात झाला.
सुत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार, शुक्रवारी रात्री ११ च्या सुमारास माळशेज घाटात एका बस आणि ट्रकची धडक झाली. या धडकेत प्रवाशी जखमी झाले आहे. एसटी बसही कल्याणहून जुन्नरच्या दिशेने जात होती. तर ट्रक कल्याण दिशेने निघालेला होता. एकमेकांना धडक लागल्यामुळे ट्रक पलटी झाला आहे. आणि बसचे समोरचा भागाचं नुकसान झाल. याअपघातात २० प्रवाशी गंभीर जखमी झाले आहे. स्थानिकांना या घटनेची माहिती मिळताच, घटनास्थळी धाव घेतला. पोलीस देखील घटनास्थळी दाखल झाले.
प्रवाशांना अपघातग्रस्त पोलीसांच्या मदतीने प्रवाशांना बसमधून बाहेर काढण्यात आले. पोलीसांच्या मदतीने आळेफाटा येथील रुग्णालयात उपचारासाठी दाखल केलं आहे. सद्या त्याच्यावर उपचार सुरु असल्याची माहिती मिळाली आहे. सुदैवाने या घटनेत कोणतीही जीवीतहानी झाली नाही.