Pune Road Accident: पुण्यातील झेड ब्रिजजवळ भीषण अपघात, कारने दिलेल्या धडकेत एकाचा मृत्यू, २ जण जखमी

पुण्यातील झेड ब्रिज जवळ एका कराने रत्यावरील तीघांना धडक दिली आहे. या अपघातात एकाचा दुर्दैवी मृत्यू झाला आहे.

Pune Road Accident: पुण्यातील झेड ब्रिजजवळ भीषण अपघात, कारने दिलेल्या धडकेत एकाचा मृत्यू, २ जण जखमी
Accident (PC - File Photo)

Pune Road Accident: पुण्यातील झेड ब्रिज जवळ एका कराने रत्यावरील तीघांना धडक दिली आहे. या अपघातात एकाचा दुर्दैवी मृत्यू झाला आहे. तर दोघ जण जखमी झाले आहेत. जखमींना रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. कारचालक मद्यधुंद अवस्थेत कार चालवत असल्याची माहिती मिळाली आहे. झेड ब्रिजजवळ कार चालवत असताना नियत्रंण सुटलं. आणि अपघात घडून आला.या प्रकरणी पोलीसांनी कार चालकाला अटक केले आहेय या घटनेअंतर्गत पोलीस पुढील चौकशी करत आहे.

मीडिया रिपोर्टनुसार, पुण्यातील झेड ब्रिजजवळ फोक्सवॅगन कारने रस्त्यावरून जाणाऱ्या तीन जाणांना उडवलं. या भीषण अपघातात एकाचा जागीच मृत्यू झाला आहे. तर दोन जण जखमी झाले आहे. या अपघताची माहिती मिळताच स्थानिकांनी घटनास्थळी धाव घेतले. पोलीसांना या घटनेची माहिती देण्यात आली. माहिती मिळताच, पोलिसांनी घटनास्थळी धाव घेऊन पंचनामा केला. जखमींना रुग्णालयात दाखल करण्यात आले. त्यांच्यावर उपचार सुरु असल्याची माहिती मिळाली.

घटनास्थळावरून आरोपी फरार झाला होता. पोलिसांनी अलका चौकातून आरोपील अटक करण्यात आले. कारचालकावर  दोन गुन्हे दाखल करण्यात आले.या घटनेमुळे परिसरात मोठी खळबळ  उडाली.

(The above story first appeared on LatestLY on Oct 07, 2023 09:08 AM IST. For more news and updates on politics, world, sports, entertainment and lifestyle, log on to our website latestly.com).