SSC-HSC Exam 2020-21 Update: दहावी-बारावीच्या विद्यार्थ्यांना जूनमध्येही देता येणार परीक्षा, मात्र 'या' असतील महत्त्वाच्या अटी
मात्र त्यासाठी काही ठराविक अटी घालण्यात आल्या आहेत.
कोरोनाच्या पार्श्वभूमीवर महाराष्ट्रात दहावी-बारावीच्या परीक्षा (SSC-HSC Exams 2020-21) ऑनलाईन होणार की ऑफलाईन असा प्रश्न अनेक विद्यार्थ्यांना तसेच पालकांना पडला होता. मात्र या परीक्षा ऑफलाईन पद्धतीनेच होणार असे शालेय शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड (Varsha Gaikwad) यांनी घोषित केल्यानंतर विद्यार्थ्यांचा जीव भांड्यात पडला. तसेच कोरोनाची टांगती तलवार मागे असल्यामुळे अनेकांना भीती वाटत आहे. त्या दृष्टीने योग्य ती खबरदारी घेण्यात आली असून त्यात आणखी एक दिलासादायक बातमी समोर आली आहे. कोरोनामुळे दहावी आणि बारावीचे जे विद्यार्थी ठरलेल्या तारखेला परीक्षा देऊ शकणार नाहीत, त्यांच्यासाठी जूनमध्ये विशेष परीक्षा घेण्यात येणार आहे. मात्र त्यासाठी काही अटी घालण्यात आल्या आहेत.
महाराष्ट्रात कोरोनाची संख्या वाढत असल्याने दहावी-बारावीची परीक्षा देणा-या विद्यार्थ्यांसाठी हा महत्त्वाचा निर्णय घेण्यात आला आहे. मात्र त्यासाठी काही ठराविक अटी घालण्यात आल्या आहेत.हेदेखील वाचा- Maharashtra SSC HSC April 21 Modified Final Time Table: वाढीव वेळेनुसार यंदाच्या 10वी,12वी बोर्ड परीक्षांचं सुधारित वेळापत्रक जारी
काय आहेत अटी?
- संबंधित विद्यार्थी कोरोनाबाधित असेल, विद्यार्थ्यांच्या घरात, परिसरात कोरोना रुग्ण असतील आणि तो राहात असलेला भाग सील केला असेल, तर अशा विद्यार्थ्यांना आता दहावी आणि बारावीची परीक्षा देता येणार नाही. त्यांच्यासाठी जूनमध्ये विशेष परीक्षा घेतली जाणार आहे.
- आताच्या परीक्षेला विद्यार्थी आला नाही तर संबंधित शाळांनी त्या विद्यार्थ्यांची माहिती शिक्षण मंडळाला द्यायची आहे. यामुळे या विद्यार्थ्यांचं वर्ष वाया जाणार नाही आणि विद्यार्थ्यांना जूनमध्ये परीक्षा देता येईल.
दरम्यान गेल्या अनेक दिवसांपासून दहावी-बारावीच्या परीक्षा या ऑनलाईन व्हाव्यात अशी मागणी पालकांकडून होत होती. मात्र शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड यांनी यावर स्पष्टीकरण देत या परीक्षा ऑफलाईनच होणार असे घोषित केले आहे. याबाबतचे एक पत्रक शिक्षणमंत्र्यांनी प्रसिद्ध केले आहे.
तसेच मागील वर्षभराची स्थिती पाहता शिक्षण मंडळाने आता यंदा महाराष्ट्र बोर्डाच्या दहावी(SSC) आणि बारावीच्या (HSC) विद्यार्थ्यांसाठी परीक्षेत थोडे बदल केले आहेत. काही दिवसांपूर्वी शालेय शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड यांनी दिलेल्या माहितीनुसार यंदा प्रॅक्टिकल परीक्षांऐवजी विद्यार्थ्यांना असाईनमेंट पूर्ण कराव्या लागतील तर लेखी परीक्षेसाठी देखील अर्धा तास अधिकचा वेळ देण्यात आला आहे.या बदललेल्या वेळांनुसार बोर्डाने यंदा 10वी, 12वी च्या बोर्ड परीक्षांचे सुधारित वेळापत्रक अधिकृत वेबसाईटवर जारी केले आहे.