Split In Shiv Sena Case: शिवसेना आमदार अपात्रता प्रकरणाची सुनावणी आजपासून
मागील चार महिने विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर वेळकाढूपणा करत असल्याचा ठाकरे गटाचा आक्षेप आहे.
सुप्रिम कोर्टाने ताशेरे ओढल्यानंतर अखेर प्रलंबित असलेल्या शिवसेनेच्या आमदार अपात्रता याचिकेवर आजपासून सुनावणी होत आहे. महाराष्ट्र विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांच्या समोर आजपासून सुनावणी सुरू होत आहे. सर्वोच्च न्यायालयाने अध्यक्षांच्या वेळकाढूपणावर तीव्र नाराजी व्यक्त केली होती. तसेच पुढील सुनावणीच्या वेळी वेळापत्रक सादर करण्याचे आदेश दिले होते. त्यानुसार आता या कारवाईला वेग आला आहे.
शिवसेना पक्षामध्ये उभी फूट पडल्यानंतर शिवसेनेच्या ठाकरे गटाने तात्काळ एकनाथ शिंदेंसह त्यांच्या गटातील 16 आमदारांना अपात्र ठरविण्यासाठी उपाध्यक्षांकडे अर्ज केला होता. त्यानंतर एकनाथ शिंदे यांना साथ देणाऱ्या 40 आमदारांना अपात्र ठरविण्याकरिता अर्ज दाखल करण्यात आला. शिंदे गटाने आदित्य ठाकरे वगळता ठाकरे गटाच्या 14 आमदारांना अपात्र ठरविण्याकरिता अध्यक्षांकडे अर्ज दाखल केला होता. अशा प्रकारे 54 आमदारांच्या अपात्रतेवर अध्यक्षांना निर्णय प्रलंबित आहे. Rahul Narvekar: आमदार अपात्रता प्रकरणी कारवाई कधी? राहुल नार्वेकर यांनी दिले उत्तर .
मागील चार महिने विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर वेळकाढूपणा करत असल्याचा ठाकरे गटाचा आक्षेप आहे. त्या संदर्भात ठाकरे गटाने सर्वोच्च न्यायालयात दाखल केलेल्या याचिकेवर सरन्यायाधीश धनंजय चंद्रचूड यांनी अध्यक्षांच्या या वेळकाढूपणावर ताशेरे ओढले आहेत.