ST Buses for Ganeshotsav: लालपरी गणेशभक्तांच्या विशेष सेवेत, गणेशोत्सवानिमित्त कोकणात जाणाऱ्यांसाठी 2310 अतिरिक्त बसेस
गणेशोत्सवा दरम्यान वाढती गर्दी लक्षात घेता यंदा एसटी महामंडळाकडून गणेशभक्तांसाठी तब्बल 2310 अतिरिक्त बसेस धावणार आहेत.
गणपती उत्सवासाठी (Ganeshotsav) प्रवास करणाऱ्या गणेशभक्तांना दिलासा देणारी बातमी आहे. गणेशोत्सव काळात राज्यभरात प्रवाशांची गर्दी लक्षात घेऊन एसटी महामंडळ (ST Mahamandal) गणपती विशेष अतिरीक्त एसटी बस (ST Bus) धावणार आहेत. गणेशोत्सव हा राज्यातील सर्वात मोठा सणांपैकी एक आहे. त्या निमित्तानं दरवर्षी मुंबई (Mumbai) पुण्यातून (Pune) कोकणात (Konkan) गणेशोत्सवासाठी कोकणात जाणाऱ्या चाकरमान्यांची संख्या मोठी असते. गणेशोत्सव काळात मुंबई, पुण्यातून गणपती विशेष एसटी बसेस सोडल्या जातात. यंदाही तशी सोय करण्यात आली आहे. वाढती गर्दी लक्षात घेऊन यंदा एसटी महामंडळाकडून गणेशभक्तांसाठी तब्बल 2310 अतिरिक्त बसेस धावणार आहेत.
एसटी महामंडळाकडून 25 ऑगस्ट ते 31 ऑगस्ट 2022 या कालावधीत अतिरीक्त बसेस चालवण्यात येणार आहे. ग्रुप आरक्षणासाठी (Reservation) मुंबई (Mumbai), ठाणे (Thane), पालघर (Palghar) या विभागातून 1268 बसेस असणार आहेत. तर, वैयक्तिक आरक्षण करणाऱ्यांसाठी 872 बसेस असणार आहेत. ग्रुप आरक्षणासाठी मुंबई विभागातून 667, पालघर विभागातून 313 आणि ठाणे विभागातून 288 बसेस असणार आहेत. तसेच गणेशोत्सवानंतर (Ganeshotsav) 5 सप्टेंबर ते 11 सप्टेंबर दरम्यान कोकणातून (Konkan) मुंबईसाठीच्या अधिक बसेस असणार आहेत. (हे ही वाचा:- Ganpati Special Train: अरे वा! गणेशोत्सवानिमित्त कोकण रेल्वेकडून विशेष अतिरिक्त रेल्वेगाडी चालवण्याचा निर्णय)
कोकणातील (Konkan) प्रमूख स्थानकात 100 अतिरिक्त गाड्यांचं नियोजन एसटी महामंडळाने केले आहे. त्याशिवाय, अतिवृष्टीमुळे कोकणातील खराब झालेले रस्ते आणि त्यामुळे टायर पंक्चर होण्याचे प्रमाण वाढण्यासाठी शक्यता लक्षात घेऊन एसटी महामंडळाने मुंबई (Mumbai)-गोवा (Goa) महामार्गावरील आगार आणि दुरुस्ती पथकामध्ये नेहमीपेक्षा प्रत्येकी किमान 10 अतिरिक्त टायर ठेवण्याची सूचना महामंडळाच्या अधिकाऱ्यांनी दिली आहे.