BJP MLA Tamil Selvan यांना विशेष न्यायालयाकडून 2017 च्या बीएमसी अधिकार्‍यांवर हल्ला प्रकरणी 6 महिन्यांची शिक्षा

त्यांच्यावर कलम 313 अंतर्गत कारवाई करत त्यांनाही दोषी ठरवण्यात आले आहे.

कोर्ट । ANI

भाजपा आमदार तमिळ सेल्वन (BJP MLA Tamil Selvan) यांना सेशन कोर्टाने मोठा धक्का दिला आहे. विशेष सत्र न्यायालयाने (special court) बीएमसी अधिकार्‍यांना मारहाण केल्याच्या प्रकरणामध्ये आमदार सेल्वन यांना दोषी ठरवलं आहे. त्यांना या प्रकरणी 6 महिन्यांची शिक्षा सुनावली आहे. विशेष न्यायाधीश आर एन रोकडे यांनी याबाबतचा निकाल दिला आहे. त्यामध्ये त्यांना सहा महिन्यांच्या कारावासाची शिक्षा सुनावली आहे. आता आमदार सेल्वन विशेष न्यायालयाच्या निर्णयाला मुंबई उच्च न्यायालयात आव्हान देऊ शकतात. तो पर्यंत न्यायालयाच्या कारवाई वर स्थगिती असू शकते.

आमदार सेल्वन यांच्यासोबत 4 अन्य आरोपी देखील आहे. त्यांच्यावर कलम 313 अंतर्गत कारवाई करत त्यांनाही दोषी ठरवण्यात आले आहे. या प्रकरणाच्या सुनावणी दरम्यान एका सहायक पोलिस आयुक्त अधिकार्‍यासह 13 जणांनी आपला जबाब नोंदवला आहे. सोबत महत्त्वाचे पुरावे दिले आहेत.

काय होतं प्रकरण?

मुंबई महानगर पालिका अर्थात बीएमसी च्या कर्मचार्‍यांनी 2017 मध्ये बीएमसी निवडणूकांच्या पूर्वी सायन कोळीवाडा भागात पंजाब कॉलनी मध्ये पाहणी केली होती. त्यावेळी काही जण अवैध वीज आणि पाण्याचे कनेक्शन वापरत असल्याचं पाहिलं. त्यांचं मीटर कापण्याचा निर्णय झाला होता. बीएमसी अधिकार्‍यांनी या कारवाईच्या वेळी पोलिसांची देखील मदत घेतली होती. त्यांच्यासोबत बीएमसी अधिकार्‍यांची एक टीम घटनास्थळी पाठवली होती. जेव्हा या टीम पंजाब कॉलनी मध्ये पोहचल्या तेव्हा त्यांना काम करण्यापासून रोखण्यात आलं सोबतच त्या अधिकार्‍यांना मारहाण देखील झाली. आरोपी सेल्वन यांनी कथितरित्या बीएमसी विरूद्ध कारवाई मध्ये सुमारे 100 लोकांच्या घोळक्याचेही नेतृत्त्व केले. पोलिसांकडून अतिरिक्त फौजफाटा बोलावण्यात आल्यानंतर त्यांच्यावर नियंत्रण मिळवण्यात आलं होतं.

सायन कोळीवाडा मतदारसंघातून तमिळ सेल्वन हे भाजपाचे आमदार आहेत. 2014 अणि 2019 च्या विधानसभा निवडणूकीमध्ये ते निवडून आले आहेत. यापूर्वी ते बीएमसी मध्ये नगरसेवक देखील होते.



संबंधित बातम्या