IPL Auction 2025 Live

Ganeshostav 2023: मुंबईत गणेशोत्सवात दहा दिवस विशेष बसेसची सोय

अशा गणेशभक्तांची गैरसोय होऊ नये म्हणून बेस्टने या दहा दिवस विशेष बसेसची सोय केली आहे.

BEST Bus Worker Strike (File Image)

मुंबईसह राज्यात गणेशोत्सव सर्वात मोठ्या सणांपैकी एक आहे. गणेशोत्सवात 10 दिवस मोठ्या जल्लोषात साजरा केला जातो. राज्याच्या आणि देशाच्या कानाकोपऱ्यांतून गणेशभक्त मुंबईत दाखल होतात. गणेशोत्सवात मुंबईत रात्रीही मोठी गर्दी पाहायला मिळते.या सर्व पार्श्वभूमीवर बेस्ट प्रशासनाकडून गणेशोत्सावाला अवघा एक दिवस उरला असताना एक आनंदाची बातमी देण्यात आली आहे. (हेही वाचा - Mumbaicha Raja First Look: मुंबईच्या राजाचं प्रथम दर्शन, रायगड किल्ल्याची प्रतिकृती केली साकार)

गणेशोत्सवाच्या दरम्यान मुंबईतील अनेक मंडळाचे गणपती, विद्युद रोषणाई, डेकोरेशन पाहण्यासाठी नागरिक रात्रीचे मुंबईत फिरतात. अशा गणेशभक्तांची गैरसोय होऊ नये म्हणून बेस्टने या दहा दिवस विशेष बसेसची सोय केली आहे.गणेशोत्सवासाठी बेस्टतर्फे 19 ते 27 सप्टेंबर या कालावधीत रात्री 11 ते सकाळी 6 या वेळेत 27 बसेस सोडण्यात येणार आहेत.

सीएसएमटी ते सायन, वरळी ते काळाचौकी, नागपाडा ते ओशिवरा, शिवडी ते दिंडोशी, पायधुनी ते विक्रोळी, नागपाडा ते शिवाजी नगर, म्युझियम ते देवनार, गिरगाव ते सँडहर्स्ट रोड स्टेशन आणि म्युझियम ते शिवडी या विशेष बसेस सोडण्यात येणार आहेत. गणेशोत्सवादरम्यान पोलिसांवरही ताण असतो. मात्र यंदा पोलिसांवरील ताण कमी करण्यासाठी मुंबईतील प्रत्येक गणेश मंडळांमध्ये गणसेवक नियुक्त केले जाणार आहेत.