Somvati Amavasya 2019: जेजुरी गडावर सोमवती अमावस्या निमित्त यात्रेला सुरुवात, भविकांकडून भंडाऱ्याची उधळण

महाराष्ट्र राज्याचे कुलदैवत आणि लाखो भाविकांचे श्रध्दास्थान असणाऱ्या जेजुरीच्या खंडोबा (Khandoba) च्या यात्रेला सोमवती अमावस्यानिमित्त यात्रेला सुरुवात झाली आहे.

खंडोबा यात्रा (फोटो सौजन्य-फेसबुक)

Somvati Amavasya 2019: महाराष्ट्र राज्याचे कुलदैवत आणि लाखो भाविकांचे श्रध्दास्थान असणाऱ्या जेजुरीच्या खंडोबा (Khandoba) च्या यात्रेला सोमवती अमावस्यानिमित्त यात्रेला सुरुवात झाली आहे. तसेच लाखो भाविक दरवर्षी खंडोबाच्या दर्शनासाठी पुण्यात दाखल होत असतात.

खंडोबाच्या येथे आल्यावर भाविकांमधून 'यळकोट यळकोट जय मल्हार' हेच उच्चार त्यांच्या तोंडी ऐकायला येतात. तसेच पिवळ्याधमक भंडाऱ्याची उधळणही मंदिर परिसरात केली जाते. तसेच भाविकांना खंडोबाच्या पालखीचे सुरेख असे दर्शन यावेळी घेता येते.

 

खंडोबा मंदिर- जेजुरी (फोटो सौजन्य-फेसबुक)

 

खंडोबाच्या वर्षभरात विविध यात्रा सुरुच असतात. मात्र सोमवती अमावस्येची ही यात्रा खूप महत्वाची असल्याचे मानले जाते. तसेच खंडोबाची तलवार ही पाहण्यासारखी असून ती अत्यंत भारदस्त आहे.