फॅन्टसी क्रिकेट अ‍ॅपवर बक्षीस लागून कोट्यावधी झालेल्या पोलीस उपनिरीक्षकाची होणार चौकशी - रिपोर्ट्स

त्यांना इंग्लंड विरुद्ध बांग्लादेश सामन्यात याच ड्रीम 11 मुळं ते दीड कोटींचं बक्षीस लागलं.

Maharashtra Police | (Photo Credit - Twitter/ANI)

ऑनलाइन गेम ड्रीम इलेव्हनमध्ये (Dream 11) पोलीस उपनिरीक्षकने 1.5 कोटी रुपयांचे बक्षीस जिंकल्याची बातमी मागील काही दिवसांपासून वायरल होत आहे. सोशल अनेकांनी त्या पोलिस निरिक्षकाचं अभिनंदन केले आहे. पण आता या उपनिरीक्षकासमोर चौकशीचे फेरे उभे राहिले आहेत. सरकारी नोकरीमध्ये असताना अशाप्रकारे ऑनलाईन जुगारात सहभागी होण्यावरून आता त्याच्यावर प्रशासकीय कारवाई, चौकशी होण्याची शक्यता आहे.

मीडीया रिपोर्ट्सनुसार, सोमनाथ झेंडे असे दीड कोटी रुपयांचे बक्षीस जिंकणाऱ्या पोलीस उपनिरीक्षकाचे नाव आहे. पिंपरी-चिंचवड पोलीस आयुक्तालयात ते कामाला आहेत. मागील दीड महिन्यांपासून ते या फॅन्टसी क्रिकेट अ‍ॅपवर एका टीममध्ये हा गेम खेळत होते. अचानक त्यांना या ऑनलाईन जुगारात नशिबाची साथ मिळाली आणि दीड कोटीचं बक्षीस लागलं. पण वार्‍यासारख्या पसरलेल्या या बातमीनंतर आता त्यांच्या अडचणी देखील वाढल्या आहेत.

पिंपरी चिंचवडमधील पोलीस उपनिरीक्षक सोमनाथ झेंडेना ड्रीम 11 खेळण्याचा मोह आवरला नाही. त्यांना इंग्लंड विरुद्ध बांग्लादेश सामन्यात याच ड्रीम 11 मुळं ते दीड कोटींचं बक्षीस लागलं. करोडपती झालेला हा पोलीस उपनिरीक्षक प्रकाशझोतात आला आणि आता त्याची पोलिस उपायुक्तांकडून चौकशी होणार आहे.

पिंपरी-चिंचवड भाजपाचे माजी संघटन सरचिटणीस अमोल थोरात यांनी पोलीस उपनिरीक्षक सोमनाथ झेंडेविरुद्ध राज्याचे गृहमंत्री आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे तक्रार दिली आहे. झेंडे हे सरकारी नोकरीत कर्तव्यावर असताना ऑनलाइन जुगार खेळत असल्याचा आरोप थोरात यांनी केला आहे. ऑनलाइन जुगार, गेम यापासून तरुण पिढीला वाचविण्यासाठी शासन पातळीवर विविध उपक्रम राबविले जात असताना झेंडे हे ऑनड्यूटी ऑनलाइन जुगार कसा खेळतात, असा सवाल थोरात यांनी केला आहे.



संबंधित बातम्या

AUS W vs IND W 3rd ODI 2024 Live Streaming: आज भारताच्या महिलांसमोर मालिका वाचवण्याचे आव्हान, तर ऑस्ट्रेलिया मालिका जिंकण्यास सज्ज; तुम्ही येथे पाहून घ्या सामन्याचा आनंद

AUS W vs IND W 3rd ODI 2024 Live Streaming: ऑस्ट्रेलियाविरूध्द टीम इंडियाचा तिसरा वनडे सामना, क्लीन स्वीप टाळण्याचे भारतीय महिला संघासमोर आव्हान; जाणून घ्या कुठे पाहणार थेट प्रक्षेपण

England Beat New Zealand, 2nd Test Day 3 Full Highlights: इंग्लंडने 15 वर्षांनंतर रचला इतिहास, न्यूझीलंडचा 323 धावांनी पराभव करून जिंकली मालिका; येथे NZ विरुद्ध ENG सामन्याचे हायलाइट पहा

England Beat New Zealand, 2nd Test Day 3 Scorecard: इंग्लंडने दुसऱ्या कसोटीत इतिहास रचला, न्यूझीलंडचा 323 धावांनी केला पराभव; मालिकेत 2-0 अशी घेतली अभेद्य आघाडी; येथे पाहा NZ विरुद्ध ENG सामन्याचे स्कोअरकार्ड