सोलापूर जिल्हा परिषद सभापती पद निवडणुकीत महाविकासआघाडीकडे 3 तर भाजपला केवळ 1 सभापती पद
अर्थ व बांधकाम समिती सभापतीपदी विजयराज डोंगरे तर, कृषी व पशुसंवर्धन सभापतीपदी अनिल मोटे यांची निवड झाली.सर्वात चुरशीची निवडणुक ठरली ती समाजकल्याण समितीची या निवडणुकीत महाविकसआघाडी आणि भाजप पुरस्कृत समविचारी आघाडी यांच्यात थेट लढत झाली.
Solapur Zilla Parishad Chairman Election Result 2020: सोलापूर जिल्हा परिषद (Solapur Zilla Parishad ) सभापती निवडणुकीत महाविकासआघाडी ( Maha Vikas Aghadi) पुन्हा एकदा बाजी मारताना दिसत आहे. सभापती पदाच्या निवडणुकीत महाविकास आघाडीकडे तब्बल 3 सभापती पदं आली आहेत. तर, भाजपकडे केवळ एकच सभापती पद आहे. त्यातही भाजपला मिळालेले एक पद हे थेट भाजपला नव्हे तर, भाजप (BJP) पुरस्कृत समविचारी आघाडीला मिळाले आहे. या निकालावरुन सोलापूर (Solapur) जिल्हा परिषदेत भाजपला एकही सभापती पद मिळू शकले नाही, अशी चर्चा राज्याच्या राजकारणात सुरु झाली आहे.
दरम्यान, अर्थ व बांधकाम समिती सभापतीपदी विजयराज डोंगरे तर, कृषी व पशुसंवर्धन सभापतीपदी अनिल मोटे यांची निवड झाली.सर्वात चुरशीची निवडणुक ठरली ती समाजकल्याण समितीची या निवडणुकीत महाविकसआघाडी आणि भाजप पुरस्कृत समविचारी आघाडी यांच्यात थेट लढत झाली. यात महाविकासआघडीच्या संगिता धांडोरे तर, समविचार आघाडीचे सुभाष माने यांना समसमान 32 मतं मिळाली. त्यामुळे या दोन्ही उमेदवारांसाठी इश्वरचिठ्ठी टाकण्यात आली. या चिठ्ठीत संगीता धांडोरे यांचे नाव निघाले आणि भाजप आघाडीला एकमेव सभापती पद मिळाले. (हेही पाहा, सोलापूर: भाजप खासदार जयसिद्देश्वर शिवाचार्य यांना नोटीस; लोकसभा निवडणुकीवेळी बनावट जातप्रमाणपत्र सादर केल्याचे प्रकरण)
दरम्यान, महाविकासआघाडीच्या स्वाती शटगार यांची महिला व बालकल्याण समिती सभापती म्हणून बहुमताने निवड झाली. स्वाती शटगार यांना 35, समविचार आघाडीच्या संगिता मोटे यांना 31 मते मिळाली. विषय समिती सभापती निवडणुकीत विजयराज डोंगरे विजयी झाले.डोंगरे यांना 34 तर महाविकास आघाडीच्या रणजित शिंदे यांना ३२ मते मिळाली. विशेष म्हणजे आमदार बबनदादा शिंदे यांच्या चिरंजीवांना सभापती पदाच्या निवडणुकीत पराभव स्वीकारावा लागला.