Gautami Patil: गौतमी पाटील हिच्या कार्यक्रमात सोलापूर पोलिसांची एण्ट्री, डिजे बंद; आयोजकांवर गुन्हाही दखल

सोलापूर पोलिसांनी (Solapur Police) गौतमी पाटील हिचा सुरु असलेला कार्यक्रम मध्येच बंद पाडला आणि आयोजकांवर गुन्हाही दाखल केला. आयोजकच पोलिसांच्या रडारवर आले आणि कायद्याच्या कचाट्यातही सापडले. गौतमी पाटील हिचा कार्यक्रम आयोजित केलेप्रकरणी पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे.

Gautami Patil | (Photo credit: archived, edited, representative image)

महाराष्ट्रातील अनेक भागांत आणि लहानथोरांमध्ये गौतमी पाटील (Gautami Patil) हिची क्रेझ पाहयाल मिळत आहे. गौतमी पाटील (Gautami Patil Dance) हिचा कार्यक्रम म्हटले की, 'हाऊसफुल्ल' हा बोर्ड आलाच. महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातून गौतमीच्या कार्यक्रमांना मागणी असते. त्यातच गौतमी पाटील आणि वाद, उतावीळपणा आणि गर्दी हे आता ओघानेच येत आहे. परिणामी पोलिसांना कारवाई करावी लागत आहे. सोलापूर (Solapur) येथेही असाच काहीसा प्रकार पाहायला मिळाला. सोलापूर पोलिसांनी (Solapur Police) गौतमी पाटील हिचा सुरु असलेला कार्यक्रम मध्येच बंद पाडला आणि आयोजकांवर गुन्हाही दाखल केला. आयोजकच पोलिसांच्या रडारवर आले आणि कायद्याच्या कचाट्यातही सापडले. गौतमी पाटील हिचा कार्यक्रम आयोजित केलेप्रकरणी पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे.

राजेंद्र भगवान गायकवाड (Rajendra Gaikwad) असे गौतमी पाटील हिचा कार्यक्रम आयोजित करणाऱ्या आयोजकाचे नाव आहे. आयोजकांनी गौतमी पाटील हिचा कार्यक्रम आयोजित करण्यासाठी पोलिसांकडे कायदेशीर परवानगी मागितली होती. मात्र, पोलिसांनी होणारी गर्दी, कायदा व सुव्यवस्थेचा संभाव्य प्रश्न आदी गोष्टी लक्षात घेऊन कार्यक्रमासाठी काही कागदपत्रे मागवली. मात्र, राजेंद्र गायकवाड यांनी पोलिसांकडे कागदपत्रे दिलीच नाहीत. उलट थेट कार्यक्रमाचेच आयोजन केले. त्यामुळे पोलिसांनी कायद्याचा बडगा उगारत आयोजकांवर गुन्हा दाखल केला.

सोलापूरातील शहर पोलिसांनी भारतीय दंड संहिता कलम 188 अन्वये आणि महाराष्ट्र पोलीस अधिनियम कलम 135, 37(3) नुसार गुन्हा दाखल केला आहे. हा गुन्हा गौतमी पाटील हिचा कार्यक्रम आयोजित करणाऱ्या राजेंद्र गायकवाड यांच्यावर दाखल करण्यातत आला आहे. त्यामुळे गौतमीची अदाकारी पाहण्यापूर्वीच आयोजकांवर गुन्हा दाखल झाल्याने रसिकांचा हिरमोड झाल्याची चर्चा आहे. (हेही वाचा, Gautami Patil Lavni Dance In Satara: पैलवानाच्या आग्रहाखातर लाडक्या बैलाच्या वाढदिवसानिमित्त गौतमी पाटील साताऱ्यात (Watch Video))

गौतमीचा कार्यक्रम बंद

आयोजित कार्यक्रमासाठी नियोजित वेळेनुसार गौतमी पाटील कार्यक्रमस्थळी आली. गौतीमीचे मंचावर आयोजन होताच टाळ्या आणि शिट्ट्यांनी वातावरण भारुन गेले. उतावीळ प्रेक्षकांनी आपले कारनामे दाखवले कार्यक्रम सुरु झाला. पण, गौतमीच्या चाहत्यांच्या आनंदावर इतक्या लवकर विरजन पडेल असे कुणालाच वाटले नसेल. कार्यक्रम सुरु होताच पुढच्या काहीच वेळा पोलीस कार्यक्रमस्थळी आले. त्यांनी डीजे बंंद केला आणि स्टेजवर थिरकणारी गौतमी जागेवरच थांबली. कार्यक्रम बंद झाला. कोणत्याही प्रकरची हुल्लडबाजी आणि गोंधळ नको, म्हणून पोलिसांनी कार्यक्रम बंद करण्याचा निर्णय घेतला.

दरम्यान, राजेंद्र पाटील यांनी आयोजित केलेल्या गौतमी पाटील हिच्या कार्यक्रमासाठी प्रतिमानसी 200 रुपये तिकीट होते. हा कार्यक्रम सायंकाळी सात वाजता सुरु होणार होता. त्यामुळे चाहत्यांनी सकाळी सहा वाजलेपासूनच कार्यक्रमास गर्दी केली होती. पण प्रत्यक्षा कार्यक्रम सुरु होण्यासाठी तब्बल नऊ वाजले. नऊ वाजता कार्यक्रम कसाबसा सुरु झाला. पण, सुरुवातीचे एकच गाणे झाले आणि पोलिसांनी डीजे बंद करत कार्यक्रमही थांबवला. चाहत्यांना केवळ एकाच गाण्यावर आनंद मानावा लागला.

(Social media brings you the latest breaking news, viral news from the world of social media including Twitter, Instagram and YouTube. The above post is embedded directly from the user's social media account. This body of content has not been edited or may not be edited by Latestly staff. Opinions appearing on social media posts and the facts do not reflect the opinions of Latestly, and Latestly assumes no responsibility for the same.)

Share Now

Share Now