Loco Pilots Union On Gender Change: महिलांना मिळणारे विशेषाधिकार प्राप्तीसाठी लिंगबदाची परवानगी द्या, सोलापूर येथील लोको पायलट युनियनची मागणी
हे अधिकार मिळण्यासाठी आम्हाला लिंगबदल करण्याची परवानगी देण्यात यावी. या पत्राची सद्या प्रशासकीय वर्तुळात जोरदार चर्चा सुरु आहे. हे पत्र मध्य रेल्वे सोलापूर येथे कार्यरत असिस्टंट लोकल पायलट आणि वरिष्ठ लोको पायलट यांनी एकजुटीने आपल्या वरिष्ठ अधिकाऱ्यांना लिहीले आहे.
Solapur Loco Pilots Union Demands: सोलापूर येथे मध्य रेल्वे सेवेत कार्यरत असलेल्या लोको पायलट संघटनेने पत्र लिहून केलेल्या मागणीमुळे खळबळ उडाली आहे. या संघटनेने आपल्या पत्राध्ये म्हटले आहे की, महिलांना मिळत असलेले विशेषाधिकार ( Women's Privileges) आपल्याल मिळावेत. हे अधिकार मिळण्यासाठी आम्हाला लिंगबदल करण्याची परवानगी देण्यात यावी. या पत्राची सद्या प्रशासकीय वर्तुळात जोरदार चर्चा सुरु आहे. हे पत्र मध्य रेल्वे सोलापूर येथे कार्यरत असिस्टंट लोकल पायलट आणि वरिष्ठ लोको पायलट यांनी एकजुटीने आपल्या वरिष्ठ अधिकाऱ्यांना लिहीले आहे. पत्रात आपण केवळ पुरुष असल्याने आपल्यासोबत भेदभाव केला जातो, असा दावा करण्यात आला आहे.
असिस्टंट लोकल पायलट आणि वरिष्ठ लोको पायलट यांनी आपल्या पत्रात म्हटले आहे की, आम्ही केवळ पुरुष असल्याने आम्हाला वेगळी वागणूक मिळते. महिलांना त्या गैरहजर राहिल्यास त्यांच्यावर कोणतीही कारवाई होत नाही. पुरुष कधी गैरहजर राहिले तर त्यांना काट्यावर धरले जाते. त्या कधीही कार्यालय सोडतात, कामही सोडतात, त्यांना प्रवासाचेही विशेषाधिकार आहेत. त्यांच्यासारखेच विशेषाधिकार आम्हालाही कर्मचारी म्हणून मिळावेत. त्याचा लाभ आम्हालाही घेता यावा, अशी विनंती या पत्राद्वारे करण्यात आली आहे. शिवाय या लाभासाठी आमचे पुरुष असणे आड येत असेल तर आम्हाला लिंग बदल करण्याची परवानही देण्यात यावे, असेही म्हटले आहे. (हेही वाचा, Indian Railway: महिला टिसीने केला विक्रम, इतक्या कोटींची केली रेल्वेमध्ये दंड वसूली)
ट्विट
लोको पायलट यांच्या पत्रानुसार महिलांना मिळणारे विशेषाधिकार: रात्रीच्या वेळी केव्हाही गाडीत न जाणे, सोलापूर आणि इतर कोणत्याही लॉबीमध्ये लोडेड गाडीत न जाणे, प्रत्येक खेपेला रनिंग रुमध्ये न जाता स्पेअर येणे, सेक्शनमधून परतताना स्पेयरच्या आगोदरच गाडी मिळणे, वाट्टेल तेव्हा सुट्टी मिळणे, गैरहजर राहिल्यास कोणत्याही प्रकारची कारवाई न होणे, लाईन बॉक्सला केव्हाही हात न लावणे, आपल्या मुलांना अधिकचा वेळ देणे आदी. कहर म्हणजे, पुरुष लोको पायलटांनी लिंग बदल ऑपरेशन करण्यासाठी वर्षभर रजेची मागणी केली आहे. जेणेकरुन त्यांना या सर्व लाभांचा आनंद घेता येईल.