भाजप पक्ष आगामी लोकसभा जिंकल्यास ती देशाची अंतिम निवडणुक ठरेल - सुशीलकुमार शिंदे
पंतप्रधान नरेंद्र मोदी (Narendra Modi) यांच्यावर टीका करत आगामी लोकसभा निवडणुक (Lok Sabha Election) जर भाजपने जिंकल्यास ती देशाची अंतिम निवडणुक ठरेल असे वक्तव्य शिंदे यांनी केले आहे.
माजी केंद्रीय गृहमंत्री सुशीलकुमार शिंदे (Sushilkumar Shinde) यांनी भाजप (BJP)वर निशाणा साधला आहे. त्यावरुन पंतप्रधान नरेंद्र मोदी (Narendra Modi) यांच्यावर टीका करत आगामी लोकसभा निवडणुक (Lok Sabha Election) जर भाजपने जिंकल्यास ती देशाची अंतिम निवडणुक ठरेल असे वक्तव्य शिंदे यांनी केले आहे. तसेच मोदी यांच्यामध्ये हुकूमशाही भरली असल्याचा आरोपही शिंदे यांनी केला आहे.
सोलापूर (Solapur) येथील कार्यकर्त्यांच्या मनोमिलन मेळाव्या दरम्यान सुशीलकुमार शिंदे यांनी मोदी सरकारवर टीका केली. तसेच कार्यकर्त्यांना उद्देशून तुमच्यासारख्यांमुळेच माझे दिल्लीत दुकान चालते असा ही आरोप शिंदे यांनी यावेळी केला. येत्या आगामी लोकसभा निवडणुकीसाठी राजकीय पक्ष एकमेकांवर आरोपप्रत्यारोप करताना दिसून येत आहेत. (हेही वाचा-धुळ्यातून फुटणार कॉंग्रेसच्या प्रचाराचा नारळ; 1 मार्च रोजी राहुल गांधी घेणार जाहीर सभा)
तर संपूर्ण देशाचे लक्ष लागून राहिलेल्या लोकसभा निवडणुका येत्या एप्रिल-मेमध्ये पार पडण्याची शक्यता आहे. सध्या देशात असणारी मोदीविरोधी लाट पाहता कॉंग्रेस आणि इतर आघाडीच्या पक्षांसाठी ही फार महत्वाची निवडणूक असणार आहे यात काही शंका नाही.