सोलापूर: आमदार प्रणिती शिंदे यांच्याविरूद्ध जामिनपात्र वॉरंट जारी; खटल्याच्या सुनावणीला हजर न राहिल्याबद्दल कारवाई

शासकीय कामामध्ये अडथळा निर्माण केल्याप्रकरणी न्यायालयात सुरू असलेल्या खटल्यामध्ये सुनवणीसाठी हजर न राहिल्याने आमदार प्रणिती शिंदे विरोधात जामिनपात्र वॉरंट जारी करण्यात आलं आहे.

Praniti Shinde (File Photo)

कॉंग्रेस आमदार प्रणिती शिंदे (Praniti Shinde) यांच्या विरोधात सोलापूर न्यायालयात वॉरंट जारी करण्यात आलं आहे. शासकीय कामामध्ये अडथळा निर्माण केल्याप्रकरणी न्यायालयात सुरू असलेल्या खटल्यामध्ये सुनवणीसाठी हजर न राहिल्याने आमदार प्रणिती शिंदे विरोधात जामिनपात्र वॉरंट जारी करण्यात आलं आहे.

जिल्हा नियोजन बैठकीदरम्यान पालकमंत्री विजयकुमार देशमुख यांना घेराव घालण्याचा प्रयत्नामध्ये धक्काबुक्की झाल्याने पोलिस कर्मचारी जखमी झाला होता. या प्रकरणाबाबत सध्या कोर्टात खटला सुरू आहे. सुनावणीदरम्यान प्रणिती शिंदे हजर न राहिल्याने आता त्यांच्याविरोधात जामिनपात्र वॉरंट जारी करण्यात आलं आहे. प्रणितीसोबत महापालिका गटनेते चेतन नरोटे यांना 3 सप्टेंबर दिवशी न्यायालयामध्ये हजर राहण्याचे आदेश देण्यात आले आहेत.

2 जानेवारी 2018 दिवशी जिल्हा नियोजन समितीच्या बैठकीमध्ये कॉंग्रेस कार्यकर्त्यांनी जिल्हाधिकारी कार्यालयाबाहेर आंदोलन करत होते. औषधोपचरावर झालेली दरावाढ रद्द करण्याच्या मागणीसाठी आंदोलक आक्रमक झाले. यावेळेस विजयकुमार देशमुख यांच्या गाडीला घेराव घालण्याच्या प्रयत्नामध्ये धक्काबुक्की झाली. यामध्ये एक पोलिस कर्मचारी जखमी देखील झाला. या प्रकरणी प्रणिती शिंदे सह इतरांवर शासकीय कामामध्ये अडथळा निर्माण केल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे.