सोलापुर: रक्तदान शिबिराचा भन्नाट उपक्रम, रक्तदात्याला पाच लिटर पेट्रोल मोफत!
या कल्पनेनला चांगला प्रतिसाद मिळाला असून तब्बल 700 रक्तदात्यानी यामध्ये सहभाग घेतला होता.
रक्तदान (Blood Donation) हे पुण्याचे काम म्हणून ओळखलं जातं, अधिकाधिक लोकांना यासाठी प्रोत्साहन मिळावं म्हणून रक्तपेढ्या व शासनाकडून वेगवेगळ्या सवलती देखील दिल्या जातात, मात्र तरीही काही मंडळी याकडे पाठ फिरवतात. पण यावर सोलापूर (Solapur) येथील रक्तदान शिबिराने एक अशी नामी शक्कल लढवलीये की त्यानंतर शिबिराच्या बाहेर रक्दात्यांनी अक्षरशः रांग लावली होती. या शिबिरात सहभागी होणाऱ्या प्रत्येकाला आयोजक संस्थेतर्फे चक्क पाच लिटर पेट्रोल मोफत (5 Litre Petrol Free) देण्यात येणार होतं. सद्य घडीला पेट्रोलचे भाव पाहता कोणीही व्यक्ती ही ऑफर ऐकून जसा आनंदी होईल त्याच भावनेने लोकांनी मग शिबिराचं ठिकाण गाठलं.
सोलापूर येथील सिद्धेश्वर हायवे सेंटर पेट्रोल पंपाच्या वतीने स्वर्गीय गिरीश जमा यांच्या स्मृती प्रित्यर्थ रक्तदान शिबीर आयोजित करण्यात आलं होतं. यामध्ये सहभागी होणाऱ्या प्रत्येक रक्तदात्याला पाच लिटर पेट्रोल फ्री मध्ये देण्यात येणार होतं. दुपारपर्यंत या शिबिरात तब्बल 700 लोकांनी रक्तदान केलं.आणि त्यांनतर लगेचच आपल्या गाडीमध्ये किंवा सोबत आणलेल्या डब्ब्यांमध्ये पेट्रोल भरून हे रक्तदाते घरी परतले. इतक्या प्रचंड सहभागात रक्तदान पार पडल्याने आयोजकांनी समाधान व्यक्त केलं. 71 लिटर Petrol-Diesel मोफत मिळविण्याची संधी; ही आहे ऑफर
वास्तविकता अशा प्रकारे कोणतेही आमिष दाखवून रक्तदान करवून घेणे हे कायदेशीर रित्या अमान्य आहे. मात्र सध्या राज्यात रक्तसाठ्यांचा तुटवडा असल्याने या ना त्या मार्गाने रक्तदानाला प्रेरणा मिळत असेल तर त्यात हरकत नसावी असे काहींचे म्हणणे आहे.