71 लिटर Petrol-Diesel मोफत मिळविण्याची संधी; ही आहे ऑफर
प्रतिकात्मक फोटो (Photo Credits: PTI)

पेट्रोल डिझेलच्या (Petrol-Diesel) किंमतीत सातत्याने झालेली घसरण आणि पुन्हा झालेली वाढ आपण अनुभवली. त्यामुळे इंडियन ऑईल कॉर्पोरेशनने (Indian Oil Corporation) ग्राहकांसाठी खास ऑफर आणली आहे. इंडियन ऑईलने सिटी बँकेसोबत (Citi Bank) भागीदारी करत एक जबरदस्त ऑफर सादर केली आहे.

या ऑफरचा लाभ घेण्यासाठी सिटी बँकेकडून मोफत प्लॅटिनम क्रेडिट कार्डही दिलं जात आहे. या कार्डचा वापर करुन तुम्ही वर्षभरात 71 लीटर पेट्रोल किंवा डिझेल मोफत मिळवू शकता. या कार्डचा वापर करुन इंडियन ऑईलच्या कोणत्याही आऊटलेटमधून पेट्रोल किंवा डिझेल भरल्यास कोणताही चार्ज आकारण्यात येणार नाही. या कार्डसोबत ग्राहकांना हॉटेल्सची यादी देण्यात येणार असून या यादीतील हॉटेल्समध्ये 15% पर्यंतची सूट ग्राहकांना मिळू शकते. या ऑफरबद्दल अधिक जाणून घेण्यासाठी :

https://www.online.citibank.co.in/portal/newgen/cards/tab/indianoil-platinumcard.htm?eOfferCode=INCCCCTLNIOCP या संकेतस्थळाला भेट द्या. यावर ऑफरच्या सर्व नियम आणि अटींची माहिती देण्यात आली आहे.