CM Uddhav Thackeray यांच्यावर टीका करणार्‍या भाजपा कार्यकर्त्याच्या अंगावर शाई ओतणार्‍या 17 शिवसेना कार्यकर्त्यांना अटक; सोलापूर पोलिसांची कारवाई

त्यांच्याविरोधात गुन्हा नोंदवून अटकही करण्यात आली आहे.

Shiv Sena | Photo Credits: ANI

पंढरपूर मध्ये महाराष्ट्रचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (CM Uddhav Thackeray) यांवर टीका करणार्‍या भाजपा कार्यकर्त्याला शिवसैनिकांनी काल काळे फासत त्यांना बांगड्या, साडी नेसवण्याचा प्रयत्न केला. आज या घटनेबाबत 17 शिवसैनिकांना सोलापूर पोलिसांनी अटक केली आहे. यामध्ये त्यांच्याविरिधात एफआयआर दाखल आहेत. दरम्यान 5 फेब्रुवारीला पंढरपूर (Pandharpur)  मध्ये वीज महामंडळाच्या विभागीय कार्यालयात टाळे बंद झाले होते त्यावेळेस एका व्यक्तीने भाषणादरम्यान उद्धव ठाकरेंच्या विरोधात आक्षेपार्ह वक्तव्यांचा उल्लेख केला होता. त्याचा शिवसैनिकांनी आपल्या अंदाजात सामाचार घेत भर रस्त्यात काळं फासून नामदेव पायरी ते पश्चिमद्वार अशी धिंड काढली. त्यांना नेताना साडी नेसवण्याचा आणि बांगड्या घालण्याचा कार्यक्रम केला.

दरम्यान हा सारा प्रकार पोलिसांच्या उपस्थितीमध्ये झाल्याने भाजपाच्या राम कदम यांनी ट्वीटर वरून प्रतिक्रिया देताना 'पंढरपूर मध्ये शिवसेनेच्या कार्यकर्त्यांच्या पोलिसांच्या समोर कायदा हातात घेऊन नंगानाच ? राज्यात सत्ता आहे याचा इतका दुरुपयोग . सैनिकाच्या घरात घुसून त्याला मारण्यापासून पंढरपूरच्या रस्त्यावर खुद्द पोलिसांसमोर कायदा हातात घेण्यापर्यंत शिवसेना कार्यकर्त्यांची मजल जाते.' असं म्हणत टीकास्त्र डागत व्हिडीओ शेअर केला होता. त्यांच्या पाठोपाठ किरीट सोमय्या यांनी देखील आपली कारवाईची मागणी केली होती.

मीडीया रिपोर्ट्सनुसार, संदीप केंदळे, रवी मुळेसह सोलापूरात 17 शिवसेना कार्यकर्त्यांच्या विरोधात कारवाई करण्यात आली आहे. त्यांच्याविरोधात गुन्हा नोंदवून अटकही करण्यात आली आहे. सध्या भाजपा- शिवसेनेमध्ये वाद प्रकोपाला गेले आहेत. कालच सिंधुदूर्ग मध्ये बोलताना अमित शाह यांनी शिवसेना पक्षावर दगाबाजीचे आरोप केले आहेत. सत्तेसाठी लाचार होऊन त्यांनी कॉंग्रेस- एनसीपी सोबत युती केल्याचा आरोप केला आहे.