जेष्ठ समाजसेवक द्वारकादास लोहिया यांचे दु:खद निधन

द्वारकादास लोहिया यांचे दु:खद निधन झाले आहे. ते 81 वर्षाचे असून गेले काही दिवस आजारी होते.

जेष्ठ समाजसेवक द्वारकादास लोहिया ( फोटो सौजन्य- फेसबुक )
मानवलोकचे संस्थापक डॉ. द्वारकादास लोहिया यांचे दु:खद निधन झाले आहे. ते 81 वर्षाचे असून गेले काही दिवस आजारी होते. तर आज दुपारी त्यांच्या पार्थिवावर २ वाजता मानवलोक मुख्य कार्यालयाच्या परिसरात अंत्यसंस्कार होणार आहेत.
सामान्यांचा आधारवड म्हणून द्वारकादास यांची ओळख होती. तर राष्ट्रसेवादल, सानेगुरुजी आरोग्य मंडळ, सोशालिस्ट पार्टी यांसारख्या संघटनांमध्ये त्यांनी सहभाग घेतला होता. तसेच द्वारकादास यांनी सर्वसामान्यांच्या दु:खावर पांघरुण घालून त्यांचे महत्व जपणारे आणि संघर्षाची प्रेरणा देणारे असे त्यांचे व्यक्तिमत्व होते. द्वारकादास यांनी अंबाजोगाईचे नाव त्यांनी जगाच्या पाठीवर  पोहचविले आहे.
जेष्ठ समाजसेवक द्वारकादास हे हिंदी साहित्य विशारद होते. तसेच मराठवाडा विकास आंदोलन 1972 मधील दुष्काळ आंदोलन, मंत्र्यांना गावात प्रवेशबंदी, 1975 मधील आणीबाणीच्या वेळी तुरुंगवास अशी अनेक विशेष कार्ये द्वारकादास यांनी पार पाडली आहेत.