Dhananjay Munde Health Update: तीव्र पोटदुखीच्या त्रासामुळे सामाजिक न्याय मंत्री घनंजय मुंडे मुंबईच्या लीलावती रुग्णालयात दाखल
पोटदुखीच्या त्रासामुळे महाराष्ट्राचे सामाजिक न्याय मंत्री आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे नेते घनंजय मुंडे (Dhananjay Munde) हे मुंबईच्या (Mumbai) लीलावती रुग्णालयात (Lilavati Hospital) दाखल झाले आहेत.
राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आणि सामाजिक न्याय मंत्री धनंजय मुंडे (Dhananjay Munde) हे तीव्र पोटदुखीच्या त्रासामुळे मुंबईच्या (Mumbai) लीलावती रुग्णालयात (Lilavati Hospital) दाखल झाले आहेत. धनंजय मुंडे यांनी स्वत: ट्विट करून याबाबत माहिती दिली आहे. सध्या त्यांची प्रकृती स्थिर असून ते लवकरच जनतेच्या सेवेसाठी आपल्या कामावर रुजू होणार असल्याचेही त्यांनी सांगितले आहे. धनंजय मुंडे यांनी गेल्या काही महिन्यांपूर्वी कोरोनावर मात करुन सुखरुप आपल्या घरी परतले होते. यातच तीव्र पोटदुखीच्या समस्याने डोके वर काढल्यानंतर त्यांना पुन्हा एकदा रुग्णालयाची पायरी चढावी लागली आहे.
तीव्र पोटदुखीमुळे मागील काही दिवसांपासून मी त्रस्त आहे. त्यामुळे उपचारासाठी आज मुंबईच्या लीलावती हॉस्पिटलमध्ये दाखल झालो आहे. प्रकृती स्थिर असून उपचार घेऊन मी लवकरच पुन्हा आपल्या सेवेत दाखल होईल, अशा आशयाचे ट्विट धनंजय मुंडे यांनी केले आहे. हे देखील वाचा- Marathi Artists Met Raj Thackeray: जागतिक मराठी नाट्यकर्मी संघाने आज मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांची घेतली भेट; नाटक सुरु करण्यासंदर्भात येणाऱ्या अडचणी मांडल्या
धनंजय मुंडे यांचे ट्विट-
याआधी धनजंय मुंडे यांना श्वास घेताना त्रास होत असल्याने त्यांना 12 जून रोजी तातडीने ब्रीच कँडी हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले होते. दरम्यान, त्यांची कोरोना चाचणी पॉझिटिव्ह आल्यानंतर 11 दिवस त्यांच्यावर उपचार सुरु होते. त्यांच्या प्रकृतीत सुधारणा झाल्यानंतर त्यांना 22 जून रोजी त्यांना रुग्णालयातून डिस्चार्ज देण्यात आला होता. त्यानंतर पुढील 14 दिवस क्वारंटाईन राहिल्यानंतर धनंजय मुंडे कामावर रुजू झाले होते.