अण्णा हजारेंकडून उपोषणाची तलवार म्यान; गिरीश महाजनांच्या मध्यस्थीनंतर घोषणा

मंत्री महाजन यांनी भेट घेतल्यानंतर आपल्या विविध मागण्यांबाबत सरकारने उचललेली पावले अश्वासक असल्याचेही अण्णांना जाणवले.

सामाजिक कार्यकर्ते अण्णा हजारे आणि मंत्री गिरीश महाजन (संग्रहित आणि संपादित प्रतिमा)

अहमदनगर: .... आणि ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते अण्णा हजारे यांनी पुकारलेले संपाचे हत्यार अखेर तात्पुरते म्यान केले आहे. जनलोकपाल कायद्याची अंमलबजावणी सरकारने करावी. या प्रमुख मागणीसाठी अण्णांनी उपोषणाचे हत्यार उपसले होते. दरम्यान, अण्णांनी उपोषण मागे घ्यावे,यासाठी गिरीष महाजन यांनी केलेली मध्यस्थी कामी आली. अण्णांनी आपल्या होऊ घातलेल्या उपोषणाला अर्धविराम दिला. विशेष म्हणजे, मंत्री महाजन यांनी भेट घेतल्यानंतर आपल्या विविध मागण्यांबाबत सरकारने उचललेली पावले अश्वासक असल्याचेही अण्णांना जाणवले. त्यानंतर सरकारने उचलेल्या पावलांतून आशेचे किरण दिसत असल्याचे प्रमाणपत्र देत उपोषण स्थगित केल्याची घोषणा अण्णा हजारे यांनी केली.

 विविध मागण्यांवर सरकार सकारात्मक

आज (2 ऑक्टोबर) महत्मा गांधी यांची जयंती. या दिवसाचे औचित्य साधत आपल्या विविध मागण्या मान्य न झाल्यास अण्ण हजारे यांनी उपोषणाचा इशारा दिला होता. दरम्यान, अण्णांनी उपोषणाची तलवार म्यान करावी. म्हणून त्यांची समजूत काढण्यासाठी सरकारच्या वतीने जलसंपदामंत्री गिरीश महाजन हे स्वत: राळेगणसिद्धीत दाखल झाले. महाजन यांनी अण्णांशी विविध मुद्द्यांवर चर्चा केली. तसेच, आपल्या विविध मागण्यांवर सरकार सकारात्मक आहे. या मागण्यांच्या पूर्ततेसाठी सरकार केंद्र सरकारकडे पाठपूरावा करत आहे. त्यामुळे आपल्या मागण्यांवर लवकरच तोडगा निघेल, असं अश्वासन महाजन यांनी अण्णांना दिले.

दरम्यान, महाजनांनी केलेली मध्यस्थी सद्यस्थितीत कामी आल्याने अण्णांनी आपला उपोषणाचा निर्णय स्थगित केला आहे.

काय आहेत अण्णांच्या मागण्या ?

केंद्रातील लोकपालाप्रमाणे राज्यात लोकायुक्त नेमा

कृषिमूल्य आयोगाला स्वायत्तता द्या

लोकायुक्ताला मुख्यमंत्री, मंत्री, आमदार, आयएएस अधिकाऱ्यांच्या चौकशीचे अधिकार द्या.