Sitar and Tanpura Receive GI Tags: 'मेड-इन-मिराज' तंतुवाद्य सितार आणि तानपुरा यांना मिळाला 'जीआय टॅग'

Sitar and Tanpura GI Tags | Photo Credits: Archived, edited, symbolic images)

Made-in-Miraj Sitar and Tanpura: सांगली (Sangli) जिल्ह्याचे भौगोलिक आणि ऐतिहासिक महत्त्व सर्वांनाच माहिती आहे. याच सांगली जिल्ह्यातील मिरज येथील तंतुवाद्ये (String Instruments of Miraj) जगभरात प्रसिद्ध आहेत. ज्याची आता राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय पातळीवरही दखल घेतली गेली आहे. मिरज येथे निर्मिती केल्या जाणाऱ्या तंतुवाद्यांपैकी सितार (Sitar GI Tag) आणि तंबोरा ज्याला तानपूरा (Tanpura GI Tag) म्हणूनही ओळखले जाते. आता या दोन वाद्यांना भौगोलिक मानांकन (Geographical Indication) म्हणजेच जीआय टॅग (GI Tags) मिळाला आहे. मिरज शहराला तंतुवाद्य निर्मिती करण्याची जवळपास 200 वर्षांपासून अधीक काळाचा परंपरा लाभली आहे. या वाद्यांनी स्वातंत्र्यपूर्व आणि स्वातंत्र्यानंतर जन्मलेल्या अनेक कलाकार आणि रसिसांना मंत्रमुग्ध केले आहे. देशाच्या सांगितीक क्षेत्रातही महत्त्वाचे योगदान दिले आहे. मिरजेतील कारागिर सतार आणि तंबोऱ्यासोबतच तानपुरा, सतार, दिलरुबा, सारंगी, ताऊस, रुद्रवीणा आणि सूरबहार सारखी वाद्ये बनवतात.

तंबोरा आणि सितार यांना जीआय टॅग प्राप्त

मिरजच्या तंतुवाद्य निर्मितीमध्ये महत्त्वाचे स्थान निभावणाऱ्या मिरज म्युझिकल इन्स्ट्रुमेंट क्लस्टरला सितारचा GI टॅग मिळाला, तर हाच टॅग सोलट्युन म्युझिकल इन्स्ट्रुमेंट प्रोड्युसर कंपनीला तानपुरासाठी मिळाला. मिरज म्युझिकल इन्स्ट्रुमेंट क्लस्टर आणि सोलट्यून म्युझिकल इन्स्ट्रुमेंट प्रोड्युसर कंपनी या अनुक्रमे सितार आणि तानपुरा निर्मिती करतात. त्यांचे ग्राहक आणि चाहते भारतासह जगभरात पाहायला मिळतात.   या वाद्यांना मिळालेले  'भौगोलिक मानांकन' शहराच्या दृष्टीने महत्त्वाचे मानले जात आहे. (हेही वाचा, GI Tags Maharashtra: 'चिंच','ज्वारी', 'कोथिंबीर' यांसह महाराष्ट्राला नऊ 'भौगोलिक मानांकन'; घ्या जाणून)

1850 पासून तंतुवाद्य निर्मिती परंपरा

मिरज शहरात निर्मिती केली जाणारे तंतुवाद्ये ही फार पुर्वीपासून म्हणजे जवळपस 1850 पासून बनवली जातात. इथल्या नागरिकांचा तो पारंपरिक व्यवसायही बनला आहे. आजवर परंपरा म्हणून व्यवसाय करणाऱ्या या नागरिकांना आता जीआय टॅग मिळाल्याने हा व्यवसाय आणि वाद्यांना वेगळी ओळख मिळेल. खास करुन जागतिक पातळीवर वाद्यनिर्मिती करणाऱ्या संगीत वाद्यांची निर्मिती करणारे शहर म्हणून मिरजेकडे अधिकृतरित्या पाहिले जाईल. मिरज म्युझिकल इन्स्ट्रुमेंट क्लस्टरचे प्रमुख मोहसीन मिरजकर यांच्या हवाल्याने दिलेल्या वृत्तात टाईम्स ऑफ इंडियाने म्हटले आहे की, मिरज म्युझिकल इन्स्ट्रुमेंट क्लस्टर ही सितार निर्मिती करणारी महत्त्वाची संस्था आहे. या वाद्यांना जीआय टॅग मिळाल्याने वाद्यासाठी वापरल्या जाणारा कच्चा माल आणि त्याच्या पुरवठाधारकांनाही फायदा होणार आहे. (हेही वाचा, अलिबागच्या पांढर्‍या कांद्याला मिळाला GI Tag)

वाद्यनिर्मितीसाठी विशिष्ट लाकूड आणि भोपळ्याचा वापर

सितार आणि तंबोरा बनविण्यासाठी विशिष्ट प्रकारचे लाकूड लागते. जे कास करुन सांगोला, बेगमपूर, मंगळवेढा भागात मिळते. या वाद्यासाठी जाड पाठीचा (साल) भोपळाही आवश्यक असतो. तोही याच भागामध्ये मिळतो. ज्याचा वापर तंतुवाद्यांसाठी केला जातो. महाराष्ट्राच्या पश्चिम भागामध्ये मिळणारे लाकूड, भोपळा आणि स्थानिक कारागिरीतून आलेले कसब यांतून निर्माण हणारे उच्च गुणवत्तेचे वाद्य जीआय टॅगमुळे आता अधिक व्याप्त पातळीवर ओळखले जआईल, असेही मोहसीन मिरजकर सांगतात.

कारागिरांची सातवी पिढी तंतुवाद्य निर्मिती व्यवसायात

स्थानिक अभ्यासकांच्या माहितीनुसार, मिरज शहराच्या शनिवारपेठ परिसरात सतार आणि तानपुरा बनवणारी सुमारे २५ कुटुंबे राहतात. या कुटुंबातील लोक तानपुरा आणि सितार बनविण्याचा व्यवसाय करतात. यातील बहुतांश लोक कारागिर आहेत. ही सर्व मंडळी त्यांच्या पिढीकडून चालत आलेला पारंपरिक व्यवसाय सांभाळतात. उल्लेखनिय असे की, सध्या वाद्यांच्या कारागिरीत असलेली ही सहावी किंवा सातवी पिढी आहे. या पिढीतील कारागिर तानपुरा, सतार, दिलरुबा, सारंगी, ताऊस, रुद्रवीणा आणि सूरबहार सारखी वाद्ये बनवतात. बनवतात."