Manoj Jarange Patil SIT Enquiry: मनोज जरांगे पाटील यांच्या मराठा आरक्षण आंदोलनाची एसआयटी चौकशी; राज्य सरकारचा निर्णय
चर्चेदरम्यान, सत्ताधारी आणि विरोधक यांच्यात जोरदार खडाजंगी मंगळवारी (27 फेब्रुवारी 2024) झाली. त्यानंतर राज्य सरकारने मनोज जरांगे पाटील यांच्या आंदोलनाची एसआयटी (Maratha Reservation Protest SIT Enquiry) द्वारे चौकशी करण्याचे आदेश देण्यात आले.
मराठा आरक्षण (Maratha Reservation) आंदोलन, त्या आंदोलनाचे विद्यमान नेते मनोज जरांगे पाटील (Manoj Jarange Patil)आणि त्यांनी राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याबद्दल काढलेले उद्गार वादाचा विषय ठरले आहेत. राज्य विधीमंडळाच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनातही जरांगे पाटील यांचे आंदोलन आणि वक्तव्यावरुन चर्चा झाली. चर्चेदरम्यान, सत्ताधारी आणि विरोधक यांच्यात जोरदार खडाजंगी मंगळवारी (27 फेब्रुवारी 2024) झाली. त्यानंतर राज्य सरकारने मनोज जरांगे पाटील यांच्या आंदोलनाची एसआयटी (Maratha Reservation Protest SIT Enquiry) द्वारे चौकशी करण्याचे आदेश देण्यात आले.
आशिष शेलार यांच्याकडून एसआयटी चौकशीची मागणी
विधानसभेमध्ये चर्चेवेळी भाजप आमदार आशिष शेलार यांनी मनोज जरांगे पाटील यांच्या वक्तव्याचा निषेध केला. तसेच, त्यांचे वक्तव्य हे अत्यंत गंभीर आहे. राज्याचे मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री यांचा उपमर्द करणारी वक्तव्ये जरांगे पाटील यांनी केली आहेत. त्यामुळे त्यांच्या वक्तव्याची राज्य सरकारने गांभीर्याने दखल घ्यायला हवी. जरांगे पाटील नेतृत्व करत असलेल्या मराठा आरक्षण आंदोलनाला कोणाची फूस आहे. त्यांना पैसा कोठून येतो. त्यांच्यावर जेसीबाने फुले उधळण्यासाठी कोणाकडू पैसा येतो. ते जेसीबी कोणाच्या कारखान्यावरुन येतात? याचीही चौकशी राज्य सरकारने करावी. तसेच, या संपूर्ण आंदोलनाचीच चौकशी एसआयटी द्वारे करावी, अशी जोरदार मागणी आशिष शेलार यांनी केली. (हेही वाचा, Manoj Jarange-Patil Withdraws His Hunger Strike: तब्बल 17 दिवसांनंतर मनोज जरांगे-पाटील यांनी उपोषण घेतले मागे; छत्रपती संभाजी नगरमध्ये घेणार उपचार)
मनोज जरांगे यांना आक्रमक केले कोणी?
मनोज जरांगे पाटील यांनी केलेल्या वक्तव्यावरुन सत्ताधारी आक्रमक असताना विरोधकांनी वेगळी बाजू मांडली. मनोज जरांगे पाटील यांनी अनेक मोर्चे काढले, उपोषण आणि आंदोलने केली. मात्र, तेव्हा आंदोलनात कोणत्याही प्रकारे हिंसा झाली नाही. त्यामुळे आंतरवाली सराटी येथे उपोषणकर्त्यांवर झालेला लाठीमार कोणी केला? कोणाच्या आदेशाने झाला? याची चौकशी होणे गरजेचे आहे. जरांगे पाटील उपोषणाला बसल्यापासून राज्य सरकारच त्यांच्या संपर्कात होते. त्यामुळे त्यांच्यासोबत झालेल्या बैठकांमध्ये काय ठरत होते, कोणत्या प्रकारची आश्वासने दिली गेली होती, यावरही प्रकाश टाकणे गरजेचे आहे. त्यामुळे जरांगे पाटील यांनी केलेल्या वक्तव्याचे कोणीही समर्थन करत नाही. पण, त्यांना या प्रकारचे वक्तव्य आणि आक्रमकता धारण करायला कोण जबाबदार आहे, याचीही चौकशी व्हायला हवी, अशी मागणी विरोधकांनी केली. या मुद्द्यावर विधानसभेतील विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार आणि काँग्रेस नेते बाळासाहेब थोरात यांनी भूमिका मांडली. (हेही वाचा, Manoj Jarange Patil On Devendra Fadnavis: मनोज जरांगे पाटील यांचा गंभीर आरोप - 'मला सलाईनमधून विष देण्याचा फडणवीसांचा डाव')
एक्स पोस्ट
दरम्यान, सत्ताधारी आणि विरोधक अशी दोन्ही बाजूंची भाषणे, मते आणि विचार ऐकल्यावर विधनसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी राज्य सरकारला मनोज जरांगे पाटील यांच्या आंदोलनाची एसआयटी चौकशी करण्याचे आदेश दिले.