Sion Hospital Building: सहा वर्षीय मुलीसोबत अतिप्रसंग, बलात्कार झाल्याचा संशय; मुंबईतील सायन रुग्णालयातील घटना
मुंबई येथील प्रसिद्ध सायन रुग्णालय (Sion Hospital, Mumbai) इमारतीच्या टेरेसवर एका 24 वर्षीय तरुणाने हे कृत्य केल्याची प्राथमिक माहिती पोलिसांनी दिली आहे.
मुंबई येथे सहा वर्षीय मुलीसोबत अतिप्रसंग (Molestation) झाल्याची धक्कादाय घटना पुढे येत आहे. मुंबई येथील प्रसिद्ध सायन रुग्णालय (Sion Hospital, Mumbai) इमारतीच्या टेरेसवर एका 24 वर्षीय तरुणाने हे कृत्य केल्याची प्राथमिक माहिती पोलिसांनी दिली आहे. कचरा वेचणारा युवक (Garbage Picker) हाच या प्रकरणातील मुख्य आरोपी असल्याचे पोलिस तपासात निष्पन्न झाले आहे. दरम्यान, आरोपीने पीडितेवर बलात्कार (Rape) केल्याचा संशय व्यक्त केला जात आहे. ही घटना रविवारी (7 नोव्हेंबर) सायंकाळी घडली.
सुरज गायकवाड असे आरोपीचे नाव असल्याचे समजते. प्राप्त माहिती आणि उपलब्ध पुरावे यावरुन पोलिासंनी आरोपीला अटक केली आहे. आरोपीने पीडितेला चॉकलेटचे अमिष दाखवले. तसेच, तुझी आई बोलवत असल्याचे खोटेच सांगत पीडितेला जवळ बोलावले. त्यानंतर आरोपीने पीडितेसोबत घृणास्पद कृत्य केले. (हेही वाचा, Hyderabad Rape Case: धक्कादायक ! हैदराबादमध्ये 6 वर्षाच्या मुलीवर शेजारच्याने केला बलात्कार, अत्याचारानंतर मुलीचा मृतदेह बेडशीटमध्ये ठेवला लपवून)
पोलिसांनी आरोपीस अटक केरुन त्याच्यावर गुन्हा दाखल केला आहे. आरोपीवर सायन रुग्णालयात भारतीय दंड संहिता कलम 354 आणि 8 तसेच पोस्को कायद्यान्वये गुन्हा दाखल केला आहे.