Mumbai: सायन रुग्णालयातील डॉक्टरांची 15 वर्षांच्या मुलावर यशस्वी शस्त्रक्रिया; मानेतून आणि खांद्यामधून काढली 2.5 किलोची गाठ
मात्र, याचा त्याला त्रास होत नव्हता. त्याला दाखल केले तेव्हा ते 22 सेमी X 30 सेमी वाढले होते. एमआरआय स्कॅनमध्ये असे दिसून आले की ते 'लिम्फॅटिक सिस्टीम' आणि रक्तवाहिन्यांचे जाळे आहे.
Mumbai: मुंबईतील सायन येथील बीएमसी (BMC) संचालित एलटीएमजी रुग्णालयातील (LTMG hospital) शल्यचिकित्सकांनी 15 वर्षांच्या मुलावर यशस्वी शस्त्रक्रिया केली. या मुलाच्या मानेतून आणि खांद्यावरून 2.5 किलो वजनाचा मोठा ट्यूमर (Tumor) त्यांनी यशस्वीपणे काढला. हा ट्यूमर घातक नव्हता. मात्र, यामुळे मुलाचे शरीर कुरूप दिसत होते. 25 सप्टेंबर रोजी मुलाला रुग्णालयात दाखल केल्यानंतर विविध क्षेत्रातील तज्ज्ञांचा समावेश असलेले डॉक्टरांचे पथक तयार करण्यात आले. त्यानंतर या मुलावर यशस्वी शस्त्रक्रिया करण्यात आली.
LTMG हॉस्पिटलचे डीन डॉ मोहन जोशी यांनी सांगितलं की, मुलाला जन्मापासूनच गाठ होती, ती हळूहळू वाढत होती. मात्र, याचा त्याला त्रास होत नव्हता. त्याला दाखल केले तेव्हा ते 22 सेमी X 30 सेमी वाढले होते. एमआरआय स्कॅनमध्ये असे दिसून आले की ते 'लिम्फॅटिक सिस्टीम' आणि रक्तवाहिन्यांचे जाळे आहे. हे ट्यूमर अंतर्गत कंठातील रक्तवाहिनी, गळ्यातील मुख्य (निळी) रक्तवाहिनीमधून वाढत होते. (हेही वाचा - Shubman Gill Medical Update: भारतीय चाहत्यांसाठी वाईट बातमी, सलामीवीर शुभमन गिल अफगाणिस्तानविरुद्धच्या पुढील सामना नाही खेळणार)
तब्बल 6.5 तासांच्या अत्यंत गुंतागुंतीच्या शस्त्रक्रियेनंतर मुलाच्या मानेतून गाठ काढण्यात आली. शस्त्रक्रिया पथकाचे नेतृत्व डॉ मुकुंद जगन्नाथन, डॉ मुकुंद जगन्नाथन, डॉ अमरनाथ मुनोल, डॉ विवेक उकेर्डे यांनी केले. डॉ. जोशी यांनी सांगितलं की, ट्यूमर रक्तवाहिन्या, नसा आणि स्नायू यांच्याभोवती फिरत असल्याने ही शस्त्रक्रिया अवघड होती.
डॉक्टरांनी सांगितले की, ट्यूमर वाढत असल्याने किशोरवयीन मुलाला योग्य वेळी रुग्णालयात आणण्यात आले होते. भविष्यातील हा ट्यूमर धोकादायक ठरण्याची शक्यता होती. त्यामुळे गुंतागुंतीच्या शस्त्रक्रियेनंतर, मुलाच्या मान-खांद्याच्या भागातून मोठा ट्यूमर काढण्यात आला, ज्यामुळे रुग्णाला मोठा दिलासा मिळाला. सध्या या मुलाची प्रकृती चांगली आहे.