No Anticipatory Bail For Nitesh Rane: नितेश राणे यांना धक्का, अटकेची टांगती तलवार कायम; संतोष परब हल्ला प्रकरणात सिंधुदुर्ग न्यायालयाने अटकपूर्व जामीन अर्ज फेटाळला

संतोष परब हल्ला प्रकरणी (Santosh Parab Attack Case) नितेश राणे यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

Nitesh Rane | (Photo Credit: Facebook )

भाजप आमदार नितेश राणे (Nitesh Rane) यांच्या अडचणी वाढल्या आहेत. सिंधुदुर्ग न्यायालायने (Sindhudurg District Court) आज त्यांचा अटकपूर्व जामीन (No Anticipatory Bail For Nitesh Rane) फेटाळला आहे. नितेश राणे यांचे वकील संग्राम देसाई माहिती देताना सांगितले की, 'जिल्हा न्यायालयाने अटकपूर्व जामीन नाकारला असला तरी आम्ही उच्च न्यायालयात दाद मागू'. संतोष परब हल्ला प्रकरणी (Santosh Parab Attack Case) नितेश राणे यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या प्रकरणात त्यांना अटक केली जाण्याची शक्यता व्यक्त केली जात होती. त्यामुळे नितेश राणे यांनी न्यायालयात अटकपूर्व जामीन मिळावा यासाठी अर्ज दाखल केला होता. या अर्जावर पाठीमागील दोन दिवसांपासून सुनावणी सुरु होती.

नितेश राणे यांच्यावर अटकेची टांगती तलवार कायम आहे. त्यामुळे नितेश राणे हे अटक टाळण्यासाठी प्रयत्न करत आहेत. त्यासाठी त्यांनी अटकपूर्व जामीनासाठी अर्ज प्रयत्न केला. मात्र, त्याला यश न आल्याने नितेश राणे यांच्या वकीलाने काल सिंधुदुर्ग बँक निवडणूक मतदानाचे कारण सांगत न्ययालयात अंतरिम जामीन मागितला. मात्र, तोही फेटाळला. न्यायालयात काल नितेश राणे यांच्या अर्जावर तीन तासांहून अधिक काळ सुनावणी झाली. त्यानंतर दुसऱ्या दिवशी म्हणजे आजही या अर्जावर सुनावणी झाली. अखेर नितेश राणे यांचा जामीन अर्ज न्यायालयाने फेटाळला. (हेही वाचा, Sindhudurg District Bank Election: सिंधुदुर्ग जिल्हा बँक निवडणूक, मतदान संपले, उद्या मतमोजणी; निकालाआधीच शिवसेना- भाजप कार्यकर्त्यांनी फोडले फटाके)

फिर्यादी संतोष परब यांच्या बाजूने अॅड. विकास पाटील शिरगावकर बाजू मांडत आहेत. तर नितेश राणे यांच्या बाजूने त्यांचे वकिल संग्राम देसाई, राजेंद्र रावराणे बाजू मांडत आहेत. प्रदीप घरत हे सरकारी वकील म्हणून खटला लढत आहेत. सुनावणी सुरु असताना कोर्टाची वेळ संपली. दरम्यान, नितेश राणे यांच्या वकीलाने दहा मिनीटांचा वेळ वाढवून मागत नितेश राणे यांच्या अंतरिम जामीनाची मागणी केली मात्र न्यायालयाने ती फेटाळली. कोर्टात आता आज काय होते याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.