Sindhudurg District Bank Election Result: सिंधुदुर्ग जिल्हा बँक निवडणूकीत विद्यमान अध्यक्ष सतीश सावंत पराभूत; महाविकास आघाडीला धक्का
सिंधुदुर्ग जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या एकूण 19 जागांसाठी आज निकालाची उत्सुकता
आज (31 डिसेंबर) सिंधुदुर्ग जिल्हा बँक संचालक मंडळाच्या पंचवार्षिक सार्वत्रिक निवडणुकीचा निकाल लागणार आहे. या निवडणूकीच्या मतामोजणीला सुरूवात झाली आहे. नारायण राणे आणि त्यांच्या कुटुंबियांनी याच्या प्रचारात लक्ष घातल्याने ती प्रतिष्ठेची बनली होती. केंद्रीय मंत्री नारायण राणे आणि भाजप महाविकास आघाडी ला या निवडणूकीत नामोहरण करणार का? याकडे सर्वांचं लक्ष असताना पहिलाच मोठा धक्का महाविकास आघाडीला बसला आहे. कणकवलीमधून सतीश सावंत (Satish Sawant) हे विद्यमान संचालक पराभूत झाले आहेत. तर विठ्ठल देसाई (Vitthal Desai) विजयी झाले आहेत. त्यांना समसमान मतं पडल्याने चिठ्ठी टाकून लावलेल्या निकालात सतीश सावंत यांचा पराभव झाला आहे.
सिंधुदुर्ग जिल्हा बँक निवडणूक निकालामध्ये सावंतवाडीतून शिवसेनेचे विद्याधर परब, मालवणमधून महाविकास आघाडीचे उमेदवार व्हिक्टर डांटस विजयी तर दोडामार्गमधून शिवसेनेचे गणपत देसाई, कुडाळमधून काँग्रेसचे विद्याप्रसाद बांडेकर विजयी झाले आहेत. शिवसेना-राष्ट्रवादी, काँग्रेस या महाविकास आघाडीचे सहकार समृद्धी पॅनेल विरुद्ध भाजपचे सिद्धिविनायक सहकार पॅनेल यांच्यात चुरशीची लढत होत आहे.
सिंधुदुर्ग जिल्हा बँक संचालक मंडळाच्या पंचवार्षिक सार्वत्रिक निवडणुकीत प्रचारामध्ये शिवसेनेचे संतोष परब यांच्यावर प्राणघातक हल्ला झाला आहे. या हल्ल्या प्रकरणी भाजप आमदार नितेश राणे यांच्यावर आरोप ठेवण्यात आले असून त्यानंतर नितेश राणे अज्ञातवासात आहेत. संतोष परब हल्लाप्रकरणातील संशयित आणि भाजपचे उमेदवार मनिष दळवी विजयी झाले आहेत. No Anticipatory Bail For Nitesh Rane: नितेश राणे यांना धक्का, अटकेची टांगती तलवार कायम; संतोष परब हल्ला प्रकरणात सिंधुदुर्ग न्यायालयाने अटकपूर्व जामीन अर्ज फेटाळला .
काल 30 डिसेंबर दिवशी झालेल्या निवडणुकीत एकूण 981 पैकी 968 मतदारांनी मतदानाचा हक्क बजावला आहे. यामध्ये 115 महिला व 853 पुरुष होते. कणकवली वगळता अन्य ठिकाणी या निवडणूकीचं शांततेत मतदान पार पडले आहे.
सिंधुदुर्ग जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या एकूण 19 जागांसाठी ही निवडणूक पार पडत आहे. 19 जागांसाठी एकूण 39 उमेदवार रिंगणात आहेत.