Adar Poonawalla On Covovax Doses: कोरोना व्हायरसच्या वाढत्या संसर्गाच्या पार्श्वभूमीवर SII ने तयार केले 5-6 दशलक्ष कोवोव्हॅक्स डोस; अदार पूनावाला यांची माहिती

केवळ सावधगिरीच्या उपायांसाठी, वृद्ध लोकांना बूस्टर डोस मिळू शकतो, परंतु तो घ्यायचा की नाही हा त्यांचा निर्णय असेल. Covovax चे पाच ते सहा दशलक्ष डोस उपलब्ध आहेत, असं अदार पूनावाला यांनी सांगितलं आहे.

Adar Poonawalla (PC - ANI/Twitter)

Adar Poonawalla On Covovax Doses: गेल्या महिन्यापासून देशभरात कोरोना रुग्णांची संख्या वाढत आहे. कोविडच्या नव्या स्ट्रेनची लागण अनेकांना झाली आहे. मात्र, हा स्ट्रेन सौम्य असून सीरम इन्स्टिट्यूट ऑफ इंडिया (SII) ने आधीच कोवोव्हॅक्स लसीचे (Covovax Doses) पाच ते सहा दशलक्ष डोस तयार केले आहेत, असे कंपनीचे मुख्य कार्यकारी अधिकारी अदार पूनावाला (Adar Poonawalla) यांनी शनिवारी माध्यमांशी बोलताना सांगितले. यावेळी पूनावाला यांनी मार्च महिन्यापासून देशात कोरोना व्हायरस संसर्गाच्या वाढत्या प्रकरणांवर भाष्य केलं.

सध्या, कोविडचा स्ट्रेन गंभीर नसून सौम्य आहे. केवळ सावधगिरीच्या उपायांसाठी, वृद्ध लोकांना बूस्टर डोस मिळू शकतो, परंतु तो घ्यायचा की नाही हा त्यांचा निर्णय असेल. Covovax चे पाच ते सहा दशलक्ष डोस उपलब्ध आहेत. आम्ही पुढील दोन ते तीन महिन्यांत समान प्रमाणात कोविशील्ड डोस देखील तयार करू, असंही पूनावाला यांनी यावेळी सांगितलं आहे. (हेही वाचा -Indian Diet, Tea-Turmeric Lowered Covid Severity: भारतीय आहार, चहा आणि हळदीच्या वापरामुळे कमी झाली कोविडची तीव्रता व मृत्यू- ICMR Study)

भारतात 24 तासांच्या कालावधीत 12,193 नवीन कोविड-19 प्रकरणांची नोंद झाली असून, संसर्गाच्या सक्रिय प्रकरणांची संख्या 67,556 वर गेली आहे, असे केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने शनिवारी सांगितले. केंद्राने शुक्रवारी उत्तर प्रदेश, तामिळनाडू आणि महाराष्ट्र या आठ राज्यांना विशेष सूचना दिल्या आहेत. या राज्यांमध्ये गेल्या काही दिवसांपासून कोरोना संसर्ग वाढत आहे.

आम्ही यूएस आणि युरोपमध्ये Covovax पुरवत आहोत. भारतात बनवलेली ही एकमेव कोविड लस आहे जी अमेरिका आणि युरोपमध्ये मंजूर आहे. सध्या मागणी खूपच कमी आहे, असंही पूनावाला यांनी यावेळी सांगितलं.