Siddhivinayak Mandir Darshan Timings On New Year: नववर्षाच्या पहिल्या दिवशी बाप्पाचं दर्शन घेण्यासाठी 'या' वेळेत खुलं असणार प्रभादेवीचं सिद्धिविनायक मंदिर!
पण यंदा गर्दी नियंत्रणामध्ये ठेवण्यासाठी ब्रम्हमुहूर्तापासूनच मंदिर देवदर्शनासाठी खुलं करण्यात आलं आहे.
नववर्षाची (New Year) सुरूवात अनेकजण देवदर्शनाने करतात. यंदा ग्रेगेरियन कॅलेंडरचा पहिला दिवस अर्थात 1 जानेवारी रविवारी येत असल्याने सर्वत्रच मंदिरामध्ये गर्दी होण्याची शक्यता आहे. मुंबई मध्येही अनेकजण प्रभादेवीच्या सिद्धिविनायक मंदिरामध्ये (Siddhivinayak Mandir) गणपती बाप्पाचं दर्शन घेऊन नव्या वर्षाची सुरूवात करतात. पण यंदा गर्दी नियंत्रणामध्ये ठेवण्यासाठी ब्रम्हमुहूर्तापासूनच मंदिर देवदर्शनासाठी खुलं करण्यात आलं आहे. हे देखील नक्की वाचा: सिद्धिविनायक मंदिरा मध्ये दर्शनाचं आमिष दाखवून फसवणूक करणार्यांपासून सावधान; आदेश बांदेकरांनी केले 'हे' आवाहन .
1 जानेवारी 2023 बाप्पाच्या दर्शनाच्या वेळा
1 जानेवारी दिवशी नववर्षाच्या पहिल्या दिवशी रविवार असल्याने अधिकाधिक भाविकांना गणरायाचं दर्शन घेता यावं म्हणून मंदिर पहाटे 3 वाजून 15 मिनिटांपासून खुलं करण्यात येणार आहे. सकाळी साडेपाचच्या सुमारास आरती होणार आहे. तर रात्री 11.30 पर्यंत भाविकांना दर्शन घेता येणार आहे.
सध्या कोविड 19 चा धोका पाहता सर्वत्र खबरदारी बाळगली जात आहे. पूर्वीप्रमाणे क्यूआर कोडनेच भाविक मंदिरात सोडले जातील हा नियम नसला तरीही मास्क बंधनकारक आहे. मंदिरात दर्शन घेण्यासाठी येतात मास्क घालणं आवश्यक असणार आहे.
काही दिवसांपूर्वी माघ गणेश जयंतीच्या पूर्वतयारीचा भाग म्हणून बाप्पाला होणारं शेंदूर लेपण पूर्ण झाले आहे. 4 दिवस मंदिर बंद ठेवून हे शेंदूर लेपन झाले आता 19 डिसेंबर पासून पुन्हा सिद्धिविनायकाचं दर्शन भाविकांसाठी खुले झाले आहे.