श्रीपाद छिंदम अहमदनगमधून तडीपार; छत्रपती शिवाजी महाराज यांच्याबद्दल काढले होते अनुद्गार
त्यावरून महाराष्ट्र आणि विधिंमंडळातही जोरदार गदारोळ झाला होता. या पार्श्वभूमीवर उपविभागीय दंडाधिकारी उज्वला गाडेकर यांनी छिंदम यास तडीपार करण्याचे आदेश दिले.
Shripad Chindam Tadipaar from Ahmednagar: महापालिका निवडणुकीतील अपक्ष उमेदवार श्रीपाद छिंदम (Shripad Chindam) याला निवडणूक काळात शहरातून तडीपार करण्यात आले आहे. छिंदम याने छत्रपती शिवाजी महाराज (Chhatrapati Shivaji Maharaj) यांच्याबद्दल अनुद्गार काढले होते. त्यावरून महाराष्ट्र आणि विधिंमंडळातही जोरदार गदारोळ झाला होता. या पार्श्वभूमीवर उपविभागीय दंडाधिकारी उज्वला गाडेकर यांनी छिंदम यास तडीपार करण्याचे आदेश दिले.
अहमदनगर शहरातील कोतवाली, तोफखाना व भिंगार कँप पोलिसांनी निवडणूक काळात शहरात कायदा व सुव्यवस्था कायम राहावी यासाठी उपाययोजना सुरु केल्या आहेत. या उपाययोजनांचा भाग म्हणून विविध स्वरुपाचे गुन्हे दाखल असलेल्यांसह विविध राजकीय पक्षांच्या पदाधिकारी, नगरसेवक आणि आजी, माजी आमदार यांच्या विरोधात तडीपारीचे प्रस्ताव दाखल केले आहेत. या प्रस्तावावर सुनावनी सुरु आहे. ही सुनावनी टप्प्या टप्प्याने सुरु असून, ती जसजशी पूर्ण होईल तसतसे तडीपारीचे आदेश काढण्यात आले आहेत.
अहमदनगर शरहातून आतापर्यंत पाच जणांविरोधात तडापारीचे आदेश देण्यात आहे आहेत. यात श्रीपाद छिंदम याच्यासोबतच ओंकार कराळे, भाऊसाहेब कराळे, मनोज कराळे, दिपक खैरे या पाच जणांचा समावेश आहे. या पाचही जणांना निवडणुकीचा निकाल लागेपर्यंत तडीपारीचे आदेश कायम असतील. ही कारवाई साधारण पंधार दिवसांसाठी असेल. विशेष म्हणजे, या आधीही महापालिका निवडणुकीवेळी छिंदम याच्यावर तडीपारीची कारवाई करण्यात आली होती.(हेही वाचा,बलात्काराचा आरोप असलेले पोलीस उपनिरिक्षक साजन सानप यांची रेल्वेखाली आत्महत्या )
दरम्यान, पोलीस दप्तरी गुन्हे दाखल असणाऱ्या काही मंडळींना शहरातील वास्तव्यास सशर्त परवानगी देण्यात आली आहे. त्यांच्यावर ५० हजार रुपयांचा जातमुचलका, चांगल्या वर्तणुकीची हमी व पोलिस ठाण्यात रोज हजेरी देण्याच्या अटी पाळाव्या लागतील. यात भाजपाचे खासदार दिलीप गांधी यांचे पुत्र सुवेंद्र गांधी, शिवसेनेचे माजी आमदार अनिल राठोड यांचे पुत्र विक्रम राठोड, राष्ट्रवादीचे उमेदवार कुमार वाकळे, संजीव भोर यांच्यासह १४ जणांचा समावेश आहे.