पुणे: शिवशाहीर बाबासाहेब पुरंदरे यांना पद्मविभूषण पुरस्कार प्रदान
शिवाशाहीर बाबासाहेब पुरंदरे यांना यंदाचा पद्मविभूषण पुरस्कार जाहीर झाल्यानंतर नुकताच तो पुण्यामध्ये त्यांना प्रदान करण्यात आला आहे.
शिवाशाहीर बाबासाहेब पुरंदरे (Shivshahir Babasaheb Purandare) यांना यंदाचा पद्मविभूषण (Padma Bbhushan) पुरस्कार जाहीर झाल्यानंतर नुकताच तो पुण्यामध्ये त्यांना प्रदान करण्यात आला आहे. पुण्याचे जिल्हाधिकारी नवलकिशोर राम यांच्या हस्ते बाबासाहेबांना हा पुरस्कार प्रदान करण्यात आला. पद्मविभूषण पुरस्कार जाहीर झाल्यानंतर 19 मार्च रोजी झालेल्या पुरस्कार प्रदान सोहळ्याला त्यांना उपस्थित राहता आले नाही. त्यामुळे त्यांच्या घरी जावून त्यांना पुरस्कार प्रदान करण्यात आला.
पहा फोटोज:
छत्रपती शिवाजी महाराजांच्या चरित्रावर गाढा अभ्यास असणारे आणि त्यांच्या चरित्रासाठी आयुष्य वेचणारे शिवशाहीर बाबासाहेब पुरंदरे यांना त्यांच्या कार्यासाठी हा पुरस्कार देवून सन्मान करण्यात आला.