IPL Auction 2025 Live

श्री सिद्धिविनायक गणपती मंदिर ट्रस्ट करणार शहीद सुनिल काळे यांच्या मुलांच्या शिक्षणाचा संपूर्ण खर्च

दरम्यान सुनिल काळे यांच्या मुलांच्या शिक्षणाची जबाबदारी मुंबईतील श्री सिद्धिविनायक गणपती मंदिर ट्रस्टकडून उचलण्यात आली आहे.

Shree Siddhivinayak Ganapati Temple | (Photo Credits: Facebook)

जम्मू-कश्मीर (Jammu and Kashmir) येथील पुलवामा (Pulwama) जिल्ह्यातील बंडजू येथे काल (23 जून) दहशतवाद्यांसोबत झालेल्या चकमकीत सुनिल काळे यांना वीरमरण आले. सुनिल काळे (Sunil Kale) हे सोलापूर (Solapur) येथील पानगाव येथील रहिवाशी होते. शहीद सुनिल काळे यांच्यावर लष्करी इतमामात अंत्यसंस्कार करण्यात आले. दरम्यान सुनिल काळे यांच्या मुलांच्या शिक्षणाची जबाबदारी मुंबईतील श्री सिद्धिविनायक गणपती मंदिर ट्रस्टकडून उचलण्यात आली आहे. त्यामुळे आता सुनिल काळे यांच्या मुलांच्या शिक्षणाचा सर्व खर्च सिद्धिविनायक ट्रस्टकडून (Shree Siddhivinayak Ganapati Temple Trust) करण्यात येणार आहे. एएनआय वृत्तसंस्थेने या संदर्भातील माहिती दिली आहे.

जम्मू कश्मीर येथील पुलवामा जिल्ह्यातील बंदजू परिसरात दहशतवादी लपून बसल्याची माहिती सुरक्षा दलाला मिळाली होती. त्यानंतर सुरक्षादल आणि पोलिसांनी शोधमोहिम सुरु केली. या शोधमोहिमे दरम्यान दहशतवाद्यांकडून अचानक गोळीबार सुरु झाला. त्यात सीआरपीएफ जवान सुनिल काळे शहीद झाले. (Solapur: शहीद सुनिल काळे अनंतात विलीन, लष्करी इतमामात अंत्यसंस्कार; पुलवामा येथे दहशतवाद्यांशी लढताना वीरमरण)

ANI Tweet:

शहीद सुनिल काळे यांच्या अंत्यसंस्कारावेळी महाराष्ट्र पोलिस दलातील अधिकारी, जिल्हाधिकारी तसंच सोलापूरचे पालकमंत्री दत्ता भरणे उपस्थितत होते. तसंच कोविड-19 च्या संकटात देखील सुनिल काळे यांना अखेरचा निरोप देण्यासाठी बार्शी तालुक्यातील नागरिक जमले होते.