Pune Shocking: पुण्यातील धक्कादायक घटना! चारित्र्याच्या संशयातून कोयत्याने वार, पत्नीच्या हत्या केल्याप्रकरणी पतीला अटक

ही घटना पुण्यातील (Pune) पिंपरी-चिंडवड (Pimpri Chinchwad) परिसरित मंगळवारी रात्री घडली आहे. याप्रकरणी हिंजवडी पोलीस ठाण्यात (Hinjewadi Police Station) गुन्हा दाखल केला असून आरोपीला पोलिसांनी बेड्या ठोकल्या आहेत.

प्रातिनिधिक प्रतिमा (Photo Credits: PTI)

चारित्र्याच्या संशयावरून पत्नीची हत्या (Murder) केल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. ही घटना पुण्यातील (Pune) पिंपरी-चिंडवड (Pimpri Chinchwad) परिसरित मंगळवारी रात्री घडली आहे. याप्रकरणी हिंजवडी पोलीस ठाण्यात (Hinjewadi Police Station) गुन्हा दाखल केला असून आरोपी पतीला पोलिसांनी बेड्या ठोकल्या आहेत. मिळालेल्या माहितीनुसार, आरोपी हा पत्नीच्या चारित्र्याच्या संशय घ्यायचा. याच वादातून आरोपीने पत्नीच्या डोक्यात कोयत्याने वार करीत तिची हत्या केली आहे. या घटनेनंतर संपूर्ण परिसरात एकच खळबळ माजली आहे. याप्रकरणी हिंजवडी पोलीस अधिक तपास करीत आहेत.

गौरी राहुल प्रतापे असे हत्या झालेल्या महिलेच नाव आहे. गौरी यांचे तीन वर्षांपूर्वी आरोपी राहुल गोकुळ प्रतापे याच्याशी लग्न झाले होते. राहुल हा सुरक्षा रक्षकाची नोकरी करतो. हे दोघेही विजयनगर माळवाडी पुनावळे परिसरात राहायचे. परंतु, शुल्लक कारणांवरून राहुल आणि गौरी यांच्यात सतत वाद व्हायचे. यामुळे गौरी जून महिन्यात तिच्या माहेरी निघून गेली होती. मात्र, त्यामुळे राहुलच्या डोक्यात तिच्याविषयी संशयाचे भूत शिरले. त्यानंतर जुलैच्या शेवटच्या आठवड्यात राहुल गौरीला पुन्हा सासरी घेऊन आला. परंतु, राहुल गौरीच्या चारित्र्यावर संशय घेत असल्याने त्यांच्या पुन्हा वाद होऊ लागले. याच वादातून मंगळवारी रात्री राहुलने गौरीच्या डोक्यात वार केले यात तिचा मृत्यू झाला आहे. हे देखील वाचा- पनवेल: सोने चोरीसाठी 60 वर्षीय व्यक्तीची गळा आवळून हत्या; 2 जण अटकेत

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, या हल्लात जखमी झालेल्या गौरीला तात्काळ रुग्णालयात नेण्यासाठी रुग्णावाहिका बोलवण्यात आली. या घटनेची माहिती होताच हिंजवडी पोलीस घटनास्थळी दाखल झाले. गौरीला वायसीएम रुग्णालयात नेले असता डॉक्टरांनी तिला मृत घोषीत केले आहे. या घटनेची माहिती होताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेऊन पंचनामा केला. याप्रकरणी हिंडवडी पोलीस अधिक तपास करीत आहेत.



00" height="600" layout="responsive" type="mgid" data-publisher="bangla.latestly.com" data-widget="1705935" data-container="M428104ScriptRootC1705935" data-block-on-consent="_till_responded"> @endif