पनवेल (Panvel) मधील बेलावली गावात राहणाऱ्या 60 वर्षीय व्यक्तीच्या हत्येप्रकरणी पोलिसांनी 2 जणांना अटक केली आहे. टाईम्स ऑफ इंडियाच्या रिपोर्टनुसार, नंदा ठाकूर (42) आणि मंगेश खेत्री असे या दोन आरोपींचे नाव असून तक्रार दाखल झाल्याच्या अगदी 48 तासांत पोलिसांंनी आरोपींना ताब्यात घेतले. बाळाराम पाटील (60) असे हत्या झालेल्या व्यक्तीचे नाव आहे. (Meerut: बायकोचा माहेरहून परतण्यास नकार, संतप्त नवऱ्याकडून पोटच्या दोन अल्पवयीन मुलीची हत्या)
मंडप डेकोरेशनचा व्यवसाय असलेल्या पाटील यांचा मृतदेह नंदा ठाकूर यांच्या घरी 13 ऑगस्टला सापडला. ओढणीने गळा दाबून त्यांची हत्या करण्यात आली होती. नंदा ठाकूर बुलढाणामधून परत आल्यानंतर तिला सायन-पनवेल हायवे वरील कळंबोळी बस स्थानकावर अटक करण्यात आली. चौकशी दरम्यान तिने खेत्री नाव पुढे केले. त्यानंतर पोलिसांनी त्यालाही ताब्यात घेतले.
13 ऑगस्टच्या दुपारी जेव्हा पाटील नंदा ठाकूरच्या घरी आले. तेव्हा तिने खेत्रीला फोन करुन पाटलांचे सोन्याचे दागिने चोरण्याचा कट रचला. या दोघांनी पाटील यांच्या नाका-तोंडात मिरचीची पूड टाकली आणि ओढणीने त्यांचा गळा घोटून हत्या केली. या घटनेनंतर नंदा आणि खेत्री यांनी ते घर बंद केले आणि तेथून पळ काढला, अशी माहिती सिनियर इन्स्पेक्टर अजय लांडगे यांनी दिली. (Pune Shocker: व्यसनाधीन पित्याची 16 वर्षीय मुलाकडून डोक्यात लोखंडी रॉड घालून हत्या)
पाटील यांच्या मुलाने बाळाराम पाटील बेपत्ता झाल्याची तक्रार पोलिसांत दाखल केल्यानंतर ही घटना समोर आली. त्यानंतर तपासात पोलिस नंदाच्या घरापर्यंत पोहचले आणि त्यांनी पाटील यांचा मृतदेह ताब्यात घेतला, अशी माहिती इन्स्पेक्टर संजय जोशी यांनी दिली.