Aurangabad: औरंगाबादच्या कोव्हिड सेंटरमध्ये घडला धक्कादायक प्रकार; कोरोनाबाधित रुग्ण चक्क गेट उघडून पडले बाहेर, पाहा व्हिडिओ
राज्यात काल (शुक्रवार, 26 फेब्रुवारी) झालेल्या 8 हजारांहून अधिक कोरोनाबाधितांची नोंद चिंताजनक आहे.
महाराष्ट्रात (Maharashtra) पुन्हा एकदा कोरोनाबाधित रुग्णांच्या (Coronavirus) संख्येत मोठी वाढ होऊ लागली आहे. राज्यात काल (शुक्रवार, 26 फेब्रुवारी) झालेल्या 8 हजारांहून अधिक कोरोनाबाधितांची नोंद चिंताजनक आहे. कोरोनाचा धोका लक्षात घेता राज्यातील विविध शहरात कडक निर्बंध लागू करण्यात आले आहेत. याच पार्श्वभूमीवर औरंगाबाद (Aurangabad) शहरातील किल्ले अर्क येथील कोव्हिड केअर सेंटमधून सर्वांनाच चिंतेत टाकणारी एक माहिती समोर आली आहे. या कोव्हिड केअर सेंटरमधील रुग्णांना वेळत जेवण न मिळल्याने त्यांनी शुक्रवारी दुपारी मोठा गोंधळ घातला. एवढेच नव्हेतर, या कोव्हिड केअर सेंटरमधील रुग्ण चक्क गेटमधून बाहेर पडत असल्याचा एक व्हिडिओ न्युज 18 लोकमतने सोशल मीडियावर शेअर केला आहे.
या कोव्हिड सेंटरमध्ये 247 कोरोनाचे रुग्ण उपचार घेत आहेत. औरंगाबाद महापालिकेकडून कोव्हिड सेंटरमधील रुग्णांसाठी जेवणाची सोय करण्यात येते. मात्र, शुक्रवारी या रुग्णांना जेवण मिळालेच नाही. यावर संतापलेल्या रुग्णांनी कोव्हिड सेंटरमध्ये धुडगूस घातला. त्यानंतर मोठ्या संख्येत रुग्ण कोव्हिड सेंटरचा गेट उघडून बाहेर पडले. रस्त्यावर जाऊन त्यांनी जेवणासाठी काही मिळेल का? याची शोधाशोध सुरू केली, अशी माहिती न्युज 18 लोकमतने दिली आहे. हे देखील वाचा- Lockdown in Amravati: अमरावती जिल्ह्यातील लॉकडाऊन 8 मार्चपर्यंत वाढवला
व्हिडिओ-
महाराष्ट्रात शुक्रवारी 8 हजार 333 कोरोनाबाधीत रुग्णांची वाढ झाली आहे. तर, 4 हजार 936 कोरोनाबाधित रुग्ण बरे झाले आहेत. एकूण 20 लाख 17 हजार 303 रुग्ण बरे होऊन दवाखान्यातून घरी पाठविण्यात आले आहेत. राज्यात एकूण 67 हजार 608 ऍक्टिव्ह रुग्ण आहेत. राज्यातील रुग्ण बरे होण्याचे प्रमाण आता 94.35% झाले आहे, अशी माहिती राजेश टोपे यांनी ट्विटरच्या माध्यमातून दिली आहे.