धक्कादायक! नेपाळच्या रिसॉर्टमध्ये सापडले 8 भारतीय पर्यटकांचे मृतदेह

ही घटना नेपाळ येथील काठमांडू (Kathmandu) येथे घडली आहे. गॅस हिटरमुळे सर्वांचा मृत्यू झाला असावा असा अंदाज लावला जात असून पोलीस याप्रकरणी अधिक चौकशी करत आहेत.

Representational Image (Photo Credits: Facebook)

नेपाळच्या (Nepal) एका हॉटेलमध्ये 8 भारतीय पर्यटकांचे (Indian tourists) मृतदेह सापडल्याने सर्वत्र खऴबळ उडाली आहे. ही घटना नेपाळ येथील काठमांडू (Kathmandu) परिसरात ही घडली आहे. गॅस हिटरमुळे सर्वांचा मृत्यू झाला असावा असा अंदाज लावला जात असून पोलीस याप्रकरणी अधिक चौकशी करत आहेत. हे सर्व पर्यटक भारतातील केरळ राज्यातील असून ते फिरण्यासाठी नेपाळला आले होते, अशी माहिती समोर आली आहे. याघटनेमुळे पर्यटकांच्या नातेवाईकांवर दुखाचे डोंगर कोसळले आहेत.

नेपाळ मध्ये पर्यटानासाठी केरळमधील काही लोक गेले होते. त्यातील आठ जणांचा मृत्यू झाल्याची बातमी कानावर पडली आहे. रिसॉर्टमधील गॅस हिटरमुळे या 8 पर्यटकांचा मृतदेह झाल्याचा अंदाज वर्तवला जात आहे. मंगळवारी रिसार्टमध्ये बेशुद्ध अवस्थेत मृतदेह सापडले. त्यांना रुग्णालयात हलवण्यासाठी हेलिकॉप्टर मागवण्यात आले. मात्र, काठमांडू येथील रुग्णालयात दाखल करण्याआधीच त्यांचा मृत्यू झाला, अशी माहिती एका वेबसाईटने दिली आहे. मिळालेल्या माहितीनुसार, रुममधील हिटर चालू असताना दरवाजा आणि खिडक्या बंद होत्या. यामुळे पर्यटकांना श्वास घेता आला नाही. यामुळे त्यांचा गुदमरून मृत्यू झाल्याचा अंदाज लावण्यात येत आहे. हे देखील वाचा- धक्कादायक! लोकमान्य टिळक टर्मिनसला जाणाऱ्या महिलेवर सामूहिक बलात्कार; चौघांना अटक

एएनआयचे ट्वीट-

पर्यटक हे केरळ येथील रहवासी असल्याचे कळाले असून त्यांच्याबाबतीत इतर कोणीतीही माहिती हाती आली नाही. तसेच यांचा मृत्यू खरेच गॅस हिटमुळे झाला आहे की यामागे आणखी काही कारण आहे, याचा शोध घेतल जात आहे.