Rape Case In Vikhroli: धक्कादायक! विक्रोळीमध्ये घरात घुसून 17 वर्षीय तरुणीवर बलात्कार; 33 वर्षीय व्यक्तीला अटक

शुक्रवारी खिडकीतून घरात घुसून नराधमाने एका 17 वर्षीय मुलीवर बलात्कार (Rape Case) केला. आरोपीला अटक (Arrest) करण्यात आली आहे. विक्रोळी पार्कसाईट पोलिस ठाण्याने (Vikhroli Parksite Police Station) आरोपीची ओळख 33 वर्षीय समीर शेख अशी केली आहे.

Rape | (Photo courtesy: archived, edited, symbolic images)

Rape Case In Vikhroli: मुंबईतून अत्यंत धक्कादायक घटना समोर आली आहे. शुक्रवारी खिडकीतून घरात घुसून नराधमाने एका 17 वर्षीय मुलीवर बलात्कार (Rape Case) केला. आरोपीला अटक (Arrest) करण्यात आली आहे. विक्रोळी पार्कसाईट पोलिस ठाण्याने (Vikhroli Parksite Police Station) आरोपीची ओळख 33 वर्षीय समीर शेख अशी केली आहे. अधिकाऱ्याने सांगितले की, तांत्रिक माहिती आणि सीसीटीव्ही फुटेजच्या आधारे त्याला अटक करण्यात आली. भारतीय न्याय संहिता आणि लैंगिक गुन्ह्यांपासून मुलांचे संरक्षण (POCSO) कायद्याअंतर्गत शेखवर बलात्कार आणि इतर गुन्ह्यांचा आरोप आहे.

मुंबई पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपीने अल्पवयीन मुलीच्या घरात खिडकीतून घुसून तिच्यावर हल्ला केला. हल्ल्यानंतर, त्याने घटनास्थळावरून पळून जाण्यापूर्वी पीडितेला धमकी दिली. सुरुवातीला मुलगी भीतीपोटी गप्प राहिली. तथापि, तिच्या कुटुंबाला पीडितेच्या वागण्यातील बदल जाणवला. त्यानंतर मुलीने घटनेचा खुलासा केला. त्यानंतर कुटुंबियांनी यासंदर्भात पोलिसांत तक्रार दाखल केली आहे. (हेही वाचा - Ambernath Suicide Case: अंबरनाथमध्ये प्रेमीयुगुलाची गळफास घेऊन आत्महत्या, कुटुंबाच्या विरोधामुळे टोकाचे पाऊल?)

दरम्यान, पार्कसाईट पोलिसांनी आरोपीविरुद्ध भारतीय दंड संहितेच्या कलम 64(2)(डी) आणि 351(2) तसेच लैंगिक गुन्ह्यांपासून मुलांचे संरक्षण (पॉक्सो) कायद्याअंतर्गत गुन्हा दाखल केला. पोलिसांनी विक्रोळी परिसरात शेखला शोधण्यासाठी आणि अटक करण्यासाठी सीसीटीव्ही फुटेज आणि इतर तांत्रिक पुराव्यांचा वापर केला. अधिकाऱ्यांनी सांगितलं की, तपास सुरू आहे.

Share Now
Advertisement


Advertisement
Advertisement
Share Now
Advertisement