मनसे प्रमुख राज ठाकरे यांच्या वाढदिवसानिमित्त शिवसेना खासदार संजय राऊत यांनी ट्विटच्या माध्यमातून दिल्या खास शुभेच्छा

“वाद वादळातही मित्रत्वाचे नाते टिकून राहिले..असे व्यंगचित्रकार..रसिक मनाचे राजकारणी राज ठाकरे यांना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा..जय महाराष्ट्र…”,अशा शब्दात राऊत यांनी राज ठाकरे यांना ट्विटरद्वारे शुभेच्छा दिल्या आहेत.

Sanjay Raut, Raj Thackeray (Photo Credits: Facebook, IANS)

महाराष्ट्र नवनिर्माण सेना अध्यक्ष राज ठाकरे (Raj Thackeray) यांच्या आज वाढदिवसानिमित्त त्यांच्या मित्रपरिवाराकडून, कार्यकर्त्यांकडून शुभेच्छांचा वर्षाव होत आहे. त्यांचे चाहतेही त्यांना सोशल मिडियाच्या माध्यमातून वाढदिवसाच्या शुभेच्छा देत आहे. त्यासोबतच शिवसेना खासदार संजय राऊत (Sanjay Raut) यांनी ट्विटरच्या माध्यमातून राज ठाकरे यांना वाढदिवसाच्या खास शुभेच्छा दिल्या आहेत. त्यांनी ट्विटच्या माध्यमातून मनसे प्रमुखांना व्यंगचित्रकार असे संबोधत वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या आहेत.

“वाद वादळातही मित्रत्वाचे नाते टिकून राहिले..असे व्यंगचित्रकार..रसिक मनाचे राजकारणी राज ठाकरे यांना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा..जय महाराष्ट्र…”,अशा शब्दात राऊत यांनी राज ठाकरे यांना ट्विटरद्वारे शुभेच्छा दिल्या आहेत. Raj Thackeray Birthday: कोरोना व्हायरसच्या पार्श्वभूमीवर राज ठाकरे आज वाढदिवस साजरा करणार नाहीत; मनसैनिकांना पत्रातुन केले 'हे' आवाहन

संजय राऊत हे शिवसेनेचे नेते आणि सामनाचे कार्यकारी संपादक असले तरीही त्यांचे राज ठाकरे यांच्याशी पूर्वीपासूनच चांगले संबंध आहेत. राऊत यांनी सामनातून राज ठाकरे आणि मनसेवर अनेकदा बोचऱ्या शब्दात टीकाही केली आहे. मात्र, असं असलं तरीही या दोन्ही नेत्यांमधील मैत्री कमी झालेली नाही.

दरम्यान महाराष्ट्रात कोरोना व्हायरसमुळे (Coronavirus In Maharashtra) निर्माण झालेल्या या संकटकाळात आपला वाढदिवस साजरा न करण्याचा निर्णय महाराष्ट्र नवनिर्माण सेना (MNS) प्रमुख राज ठाकरे (Raj Thackeray) यांनी शुक्रवारीच सुनावला होता. मात्र तरीही मनसैनिक प्रत्यक्ष भेट घेऊन शुभेच्छा देण्यासाठी स्वतःचा जीव धोक्यात घालतील यासाठी राज ठाकरे यांनी खास पत्र लिहित "तुमचा जीव जपा, कुटुंबाची काळजी घ्या, तुमच्या जीवापेक्षा मोलाचे काहीच नाही, या संकटकाळात एखाद्या गरजूला मदत करा तुमच्या शुभेच्छा माझ्यापर्यंत पोहचतील", असे राज यांनी पत्रातून म्हंटले आहे.