बाळासाहेब ठाकरे यांची जयंती शासकीय स्तरावर साजरी करण्याच्या प्रस्तावाला सर्वपक्षीय पाठिंबा
शिवसेना प्रमुख बाळासाहेबांची जयंती ही शासकीय स्तरावर साजरी करण्यात यावी याकरिता शिवसेनेतर्फे पालिकेत प्रस्ताव मांडण्यात आला होता, ज्याला सर्वपक्षीय पाठिंबा मिळाल्याने हा प्रस्ताव आता आयुक्तांच्या अभिप्रायासाठी पाठवण्यात आला आहे
महाराष्ट्रात किंबहुना देशभरात वर्षभरात अनेकदा थोर पुरुषांच्या जयंती वा पुण्यतिथी निमित्त शासकीय स्तरावर मोठमोठया कार्यक्रमाचे आयोजन केले जाते. बाईक रॅली, सामाजिक संदेश देणारे उपक्रम इत्यादींची आयोजन करून आपल्या लाडक्या नेत्याला अभिवादन केले जाते,मात्र यामध्ये शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे (Balasaheb Thackrey) यांच्या नावाला काहीसे डावलले गेले होते. बाळासाहेब ठाकरे यांनी आपल्या दमदार नेतृत्वाने महाराष्ट्राच्या जनमानसाला नेहमीच धरून ठेवले होते, आपल्या कारकिर्दित त्यांनी मराठी माणसाच्या उद्धारासाठी केलेले काम ही आजही शिवसेनेची ओळख आहे, या बाबी लक्षात घेता, बाळासाहेबांची जयंती ही शासकीय स्तरावर साजरी करण्यात यावी जेणेकरून येत्या पिढीला त्यांच्या प्रेरणादायी कार्याची माहिती मिळेल असा प्रस्ताव शिवसेनेने (Shivsena) पालिका सभागृहात मांडला होता, ज्याला सर्व पक्षांनी पाठिंबा दिला आहे.
आपल्या कार्यामुळे समाजाला दिशा देणारे थोर नेते, राष्ट्रपुरुष यांची जयंती व पुण्यतिथी सरकारी स्तरावर साजरी करण्यात यावी यासाठी सरकारने 30 नोव्हेंबर 2015 रोजी परिपत्रक काढले होते. मात्र यामध्ये भूमिपुत्र चळवळीचे प्रणेते बाळासाहेबी यांच्या नावाचा उल्लेखही नव्हता. याबाबत शिवसेना नगरसेवक किरण लांडगे यांनी पालिका सभागृहात ठरावाची सूचना मांडून बाळासाहेबांची जयंती, पुण्यतिथी शासकीय स्तरावर साजरी करण्याची मागणी केली होती. तसेच परिपत्रकात योग्य ते बदल करण्याची देखील सूचना करण्यात आली आहे.Balasaheb Thackeray: आदित्य ठाकरेने सोशल मीडियात शेअर केला 'आजा' बाळ ठाकरेंसोबतचा दुर्मिळ फोटो
दरम्यान अलीकडेच या प्रस्तावाला मंजुरी मिळाल्यामुळे हा प्रस्ताव आता आयुक्तांच्या अभिप्रायासाठी पाठवण्यात आला आहे. तसेच यानंतर राज्य सरकारच्या मंजुरीसाठी पाठवण्यात येणार आहे.